Workout Routine Tips
Workout Routine Tips esakal
लाइफस्टाइल

Workout Routine Tips : फिट राहण्यासाठी रोजच व्यायाम केला पाहिजे असं कुठं लिहीलंय, दोन दिवसाचा व्यायामही पुरे

Pooja Karande-Kadam

Workout Routine Tips :

रोज वर्कआऊट करणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला चांगलंच माहीत आहे.पण हिवाळ्यात थंडी आणि मग ऑफिसला जाण्याचा त्रास. त्यामुळे इच्छा असूनही वर्कआउट रूटीन फॉलो करू शकत नाही. सुट्टीच्या दिवशी संपूर्ण आठवडा वर्कआउट करू असे वचन आपण रोज देतो.

एका दिवसात आठवड्याचा व्यायाम भरून काढणे योग्य नाही. तरीही, काहीही न करण्यापेक्षा फिट राहण्यासाठी आठवड्यातून दोन दिवस वेळ काढणं गरजेचं आहे. तसं पाहिलं तर अगदी रोज दोनवेळा व्यायाम करणारे लोकही आहेत. पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आठवड्यातून सुट्टीचे दोन दिवस हमखास व्यायाम करावा.

पण, नक्की व्यायाम करताना तो कोणता असावा, वजन कमी करण्यासाठी असेल तर कोणता करावा याबद्दल फारशी माहिती नसते. तसेच, व्यायामाचे शेड्यूल कसे फिक्स करावे, याबद्दलही फार माहिती नसते. त्यामुळे याच प्रश्नांबद्दल आज आपण माहिती घेऊयात.

शेड्यूल फिक्स करा

कामाच्या दिवसात वर्कआऊटसाठी वेळ काढणे अवघड असेल तर सुट्टीचा दिवस वर्कआउटसाठी फिक्स करा, पण ऑफिसला जाण्याच्या दिवशीही थोडा वेळ मॅनेज करता आला तर यापेक्षा चांगलं काहीही असू शकत नाही.

झोपेतून उठल्यानंतर आणि ताजेतवाने झाल्यानंतर, कमीतकमी 30 मिनिटे व्यायाम करा. दोरीवर उडी मारणे, कार्डिओ सायकलिंग हे उत्तम पर्याय आहेत. आठवड्याचे पाच दिवस व्यायाम करू नका, तेव्हा शरीराला एक-दोन दिवस विश्रांती द्या. पण दोन दिवस जीव तोडून व्यायाम करा.

आपले लक्ष्य निश्चित करा

तुम्हाला पोटाची किंवा कंबरेची चरबी कमी करायची आहे, ती काही दिवसांच्या मेहनतीने कमी होईल, असे ध्येय निश्चित करून पुढे वाटचाल करा. दिशा मिळाल्यानंतर इच्छित स्थळी पोहोचणे सोपे होते. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रकारच्या व्यायामाचा समावेश करता यावर अवलंबून, पाच दिवस पुरेसे आहेत.

काय व्यायाम करायचा हे ठरवा

जर तुम्ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल, तर कार्डिओ हा एक अतिशय प्रभावी व्यायाम आहे. परंतु असे नाही की जर तुम्ही दिवसाचा बराचसा भाग त्यात घालवला तर आठवड्यात तुमचे वजन कमी होईल. कार्डिओसोबत योगा केल्याने चरबी तर कमी होतेच पण शरीराची लवचिकताही वाढते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: डोंबिवलीत ईव्हीएम मशीन पडले बंद

IPL 2024 Playoffs : प्लेऑफसाठी नाही कोणत्या राखीव दिवस; पावसामुळे खेळखंडोबा झाला तर कसा लागणार निकाल?

आठवेळा मतदान करणारा अल्पवयीन तरुण ताब्यात, पुन्हा होणार मतदान; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Shantigiri Maharaj Nashik Lok Sabha: शांतिगिरी महाराजांच्या अडचणी वाढणार? EVM मशीनला घातला हार 

Hapus Season : कोकण हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात;उष्ण हवामानामुळे आवक घटली, हंगाम १५ दिवस आधीच संपणार

SCROLL FOR NEXT