World Consumer Rights Day 2023 esakal
लाइफस्टाइल

World Consumer Rights Day 2023: ग्राहक हक्कांमूळेच तरूणाला एका रूपयाने तीन हजार मिळवून दिले!

ग्राहक हक्कांच्या जोरावरच या व्यक्तीला तीन हजाराची नुकसान भरपाई मिळाली

सकाळ डिजिटल टीम

बसमध्ये कंडक्टरने सुट्टे पैसे मागितल्यावर तूमच्याकडे नसतील. तर, तूम्ही एखादी नोट त्याच्याकडे सरकवता. आणि सुट्टे पैसे मागता. त्यावर कंडक्टरही कुरबूर करत पैसे घेतो आणि सुट्टे देतो. एखाद्यावेळेस नसतील पैसे सुट्टे तर तूम्ही स्टॉप आला म्हणून उतरून निघून जाता. पण, ग्राहक हक्कांच्या जोरावर एका व्यक्तीने कंडक्टरने एक रूपया परत दिला नाही म्हणून त्याला कोर्टात खेचले.

हि घटना आहे २०१९ मधील. एका व्यक्तीने बंगळुरू महानगर परिवहन महामंडळाला ग्राहक न्यायालयात खेचले. त्यावर त्या व्यक्तीला चार वर्षांनी न्याय मिळाला असून मंडळाकडून त्याला तीन हजारची नुकसान भरपाई देण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे.

2019 मध्ये रमेश नाईक नावाचा एक व्यक्ती बीएमटीसीच्या बसमधून शांतीनगर ते मॅजेस्टिक बस डेपोला गेला होता. यादरम्यान कंडक्टरने २९ रुपयांचे तिकीट काढले. तक्रारदाराने ३० रुपयेही दिले, मात्र त्यांना एकही रुपया परत दिला नाही. याबाबत नाईक यांनी बीएमटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे कंडक्टरची तक्रार केली.




मात्र त्यांनी नाईक यांना मदत करण्याऐवजी त्यांची चेष्टा करून त्यांना पळवून लावले. यामुळे दुखावलेल्या नाईक यांनी स्थानिक ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आणि 15 हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली.

या प्रकाराबाबत रमेशने मिडीयाला सांगितले की, त्या बस प्रवासाचा मनस्ताप झाला. गोष्ट केवळ एक रूपया परत करण्याची नव्हती. तर मी तो रूपया परत मागितल्यावर माझ्याची झालेल्या गैरवर्तणूकीची होती. त्याच गोष्टीमूळे मी न्यायालयात गेलो.

आता न्यायालयाने बीएमटीसीला पीडितेला 3000 रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहक न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी निकालात म्हटले आहे की, तक्रार क्षुल्लक स्वरूपाची आहे. परंतु बीएमटीसी बस कंडक्टरची वर्तणूक आणि बेजबाबदार होती.

एक रुपये असले तरीही त्याचे पैसे वसूल करणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींनुसार तो बीएमटीसीकडून योग्य नुकसानभरपाई मिळविण्याचा हक्कदार आहे. नाईक यांना सर्व पैसे त्यांना ४५ दिवसांत परत देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: ट्रेन समोर… तरीही थांबले नाहीत! मुलुंड स्टेशनवर ट्रॅकवरच सुरू ‘फिल्मी’ मारामारी, थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल

एकता कपूर यांनी त्यांच्या कथांना महिला सशक्तीकरणाचे माध्यम असल्याचे सांगितले, मांडला आपला दृष्टिकोन

Australia Cricket Contract: ऑस्ट्रेलियाच्या करारात २१ खेळाडूंनाच स्थान; मॅक्सवेलसह नामांकित खेळाडूंना वगळलं; पाहा संपूर्ण यादी

Stock Market Today: ट्रम्पच्या भूमिकेमुळे शेअर बाजारात जोरदार उसळी! Indigo चे शेअर्स चर्चेत

Latest Marathi News Live Update : भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठ्या तपासाची शक्यता

SCROLL FOR NEXT