World Disabled Day 2023 esakal
लाइफस्टाइल

World Disabled Day 2023 : दिव्यांग व्यक्तींची काळजी मिटली, सरकार देणार पेन्शन, जाणून घ्या योजनेबद्दल सर्वकाही

अपंग पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे?

Pooja Karande-Kadam

World Disabled Day 2023 : केंद्र आणि राज्य सरकारने देशातील नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून अनेक योजना सुरू केल्या आहेत. लहान मुले, महिला, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, बेरोजगार, शेतकरी यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. त्याचप्रमाणे केंद्र आणि राज्य सरकारने मिळून दिव्यांगांसाठीही योजना सुरू केल्या. 

ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तींची निवृत्तीची काळजी मिटणार आहे. कारण, सरकार दरमहा पेन्शन दिली जात आहे. निवृत्ती वेतन केवळ अपंगांनाच नाही तर विधवा आणि वृद्धांनाही दिले जाते.

अपंगत्व निवृत्ती वेतन योजना म्हणजे काय?


केंद्र सरकारने अपंग निवृत्ती वेतन योजना सुरू केली. मात्र यामध्ये राज्य सरकारकडूनही मदत दिली जाते. दरमहा २०० रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित रक्कम राज्य सरकार देते. राज्य सरकार दरमहा किमान 400 रुपये आणि कमाल 500 रुपये दरमहा देतात. ही रक्कम राज्यांनुसार बदलू शकते.

योजनेचे उद्दिष्ट:

केंद्र आणि राज्य सरकारने देशातील दिव्यांगांना स्वावलंबी आणि सक्षम बनवण्यासाठी दिव्यांग पेन्शन योजना सुरू केली. पेन्शनची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते.

दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या कोणावरही अवलंबून राहावे लागू नये यासाठी ही सुरुवात करण्यात आली आहे. अनेक राज्यांमध्ये ही रक्कम दरमहा, त्रैमासिक किंवा सहामाही दिली जाते. दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला कुठेही जाऊन अर्ज करण्याची गरज नाही. यासाठी ऑनलाइन अर्जही करता येणार आहे.

अपंग पेन्शन योजनेसाठी पात्रता काय आहे?

  • अर्जदार ज्या राज्यात अर्ज करत आहे त्या राज्यातील कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

  • उमेदवार दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असावा.

  • अर्जदाराचे वय १८ ते ५९ वर्षे दरम्यान असावे.

  • किमान 40 टक्के अपंगत्व असावे.

  • अर्जदाराने आधीच इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेत नसावा.

अपंगत्व निवृत्ती वेतन योजनेसाठी ही कागदपत्रे आवश्यक असतील

  1. आधार कार्ड,

  2. अपंगत्व प्रमाणपत्र,

  3. कायमस्वरूपी वास्तव्याचे प्रमाणपत्र,

  4. बँक खाते तपशील,

  5. पासपोर्ट आकाराचा फोटो,

  6. उत्पन्न प्रमाणपत्र,

  7. जन्म प्रमाणपत्र,

  8. बीपीएल कार्ड

अपंग पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी, अधिकृत साइट https://sspy-up.gov.in/ ला भेट देऊन अर्ज करावा लागतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तान पुन्हा बनतोय 'दहशतवादाचा कारखाना'; जैश-लष्करचे तब्बल 300 नवे अड्डे उभारण्याची तयारी, कोण देतंय इतका पैसा?

हत्तीच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू, ६ लाखांची नुकसान भरपाई; ६ महिलांचा दावा, म्हणतात,'मीच खरी पत्नी'

AUS vs SA, ODI: १८ षटकार अन् ३६ चौकार! हेड, मार्श अन् ग्रीन बरसले, ऑस्ट्रेलिया ४०० पार; अनेक विक्रम मोडले

Latest Marathi News Updates : साईबाबांच्या लाडू प्रसादामध्ये संस्थानकडून 50 टक्के वाढ

Ganpati Bappa 2025: गणपती बाप्पाला दुर्वा का अर्पण करतात? जाणून घ्या कारण आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT