World Post Day 2023 esakal
लाइफस्टाइल

World Post Day 2023: जागतिक टपाल दिनानिमित्त जाणून घ्या इतिहास आणि महत्व

९ ऑक्टोबर हा दिवस जगभरात World Post Day म्हणून साजरा केला जातो.

सकाळ डिजिटल टीम

आजकाल तंत्रज्ञान आणि टेक्नॉलॉजीमध्ये अनेक बदल झाले आहेत. मोबाईल आणि इंटरनेटमुळे तर माहितीचे जाळे अधिकच विस्तारले आहे. हे सर्व बदल मागील काही वर्षांमध्ये वेगाने झाले आहेत. परंतु, पूर्वीच्या काळी एकमेकांची ख्यालीखुशाली कळवण्यासाठी, निरोप पाठवण्यासाठी काही सरकारी कामांसाठी, नोकरीसाठी इत्यादी अनेक कामांसाठी टपालसेवेचा आधार घेतला जात होता.

ही सर्व कामे करण्यासाठी पत्रे लिहिली जात होती. तार पाठवल्या जात होत्या. आता मात्र, तारसेवा बंद झाली आहे. मात्र, टपालसेवा आणि पत्रांचे महत्व आजही कायम आहे. या ५ जी च्या काळात आज ही टपालसेवेचे महत्व अबाधित आहे. हे सर्व सांगण्या मागचे कारण म्हणजे आज ‘जागतिक टपाल दिन’ आहे. ९ ऑक्टोबर हा दिवस जगभरात World Post Day म्हणून साजरा केला जातो.

या जागतिक टपाल दिनाच्या निमित्ताने आज आपण त्याचा इतिहास जाणून घेणार आहोत.

जागतिक टपाल दिनाचा इतिहास काय ?

जगात दरवर्षी ९ ऑक्टोबरला 'जागतिक टपाल दिन' उत्साहात साजरा केला जातो. यामागचा उद्देश हा आहे की, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना माहिती देणे, आणि विविध सेवांविषयी लोकांना जागरूक करणे होयं. या सर्व माहितीविषयी आणि सेवांविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी, हा देखील या दिनामागचा हेतू आहे.

१८७४ मध्ये स्वित्झरलॅंडची राजधानी असलेल्या ‘बर्न’ शहरामध्ये जगभरातील २२ देशांनी युनिव्हर्सल पोस्टल युनियन (युपीयू) ची उभारणी करण्यासाठी महत्वाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर, १९६९ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका खास संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती.

सर्वात प्रथम हा ‘जागतिक टपाल दिन’ जपानच्या टोकियोमध्ये ९ ऑक्टोबर १९६९ मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यानंतर, ९ ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो.

विशेष म्हणजे १ जुलै १८७६ मध्ये आपला भारत देश सुद्धा ‘युनिव्हर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य झाला होता. हे सदस्यत्व मिळवणारा भारत हा पहिलाच आशियाई देश ठरला होता. त्यानंतर. १ ऑक्टोबर १८५४ मध्ये भारत सरकारने टपालसेवेसाठी एका विभागाची स्थापना केली होती.

भारतीय टपालसेवेशी निगडीत महत्वाच्या बाबी

  • भारतात आज जगातील सर्वात मोठे पोस्टल नेटवर्क आहे आणि ही सर्व भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे.

  • १७७४ मध्ये भारतातील कोलकाता शहरात भारताचे पहिले पोस्ट ऑफिस सुरू करण्यात आले होते. या पोस्ट ऑफिसची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने केली होती.

  • १८८० मध्ये भारतात मनीऑर्डर प्रणाली सर्वात प्रथम सुरू करण्यात आली होती.

  • स्पीडपोस्टची सुरूवात भारतात १९८६ मध्ये करण्यात आली होती.

  • जगातील पहिल्या अधिकृत एअरमेलचे उड्डाण हे भारतात १८ फेब्रुवारी १९११ मध्ये फ्रेंच पायलटद्वारे करण्यात आले होते.

  • पहिले अधिकृत टपाल तिकीट हे स्वतंत्र भारतात २१ नोव्हेंबर १९४७ मध्ये जारी करण्यात आले होते.

  • सध्याच्या डिजिटलायझेशनच्या जमान्यात ऑनलाईन टपाल व्यवहारांवरील लोकांचा विश्वास वाढला आहे आणि हा विश्वास आजही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Election Results: ठाकरे ब्रँडला एकटे प्रसाद लाड कसे ठरले वरचढ? मुंबईतल्या 'बेस्ट'च्या निवडणुकीचा निकाल

Stock Market Closing: शेअर बाजार 3 आठवड्यांच्या उच्चांकावर बंद; आयटी आणि एफएमसीजीमध्ये मोठी वाढ

बॉलिवूडचा एक असा खलनायक ज्याच्यामुळे अमिताभ बच्चन झाले सुपरस्टार ! त्याचा मृत्यू अखेरपर्यंत रहस्यच राहिला

Who Is Shashank Rao : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधुंना शह देणारे शशांक राव कोण? कशी केली कमाल?

Rain-Maharashtra Latest Live News Update: नांदेडमध्ये पुरामुळे लाखो हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT