Writting
Writting Sakal
लाइफस्टाइल

परिघाबाहेर पडूया, चला लिहित्या होऊया

सकाळ वृत्तसेवा

सुचिता देशमुख

छंद म्हणजे हक्काचा ''मी टाइम''. छंद जोपासायाचे असतात ते स्वतःसाठी. छंद स्वतःला अभिव्यक्त करतात. ''मी '' कोण अशी जाणीव करून देतात. तर कधी कधी हे छंद दुसऱ्यांना आनंदी करतात. आनंदाने जगू पाहणाऱ्या छंदवेड्यांच ई गोष्ट'' आम्ही '' स्व''छंदी'' सदरातून वाचूया.

आपल्या भावना आपल्याला लिहून ठेवता यायला हव्या, असे आपण म्हणतो. पण याच भावना आपण कधी लिहितो ? जर आपल्या मनामध्ये विचारांचं काहूर माजलेल असेल, आपल्या भावना तीव्र असतील, वेदना मनाला घायाळ करत असतील, मनामध्ये ''घुसमट'' असेल, ''घालमेल'' असेल, तरच आपण पेन आणि कागद हातात घेतो आणि लिहायला लागतो. एखाद्या गोष्टीवर आपण जितके जास्त चिंतन करतो, तितकच आपण सुंदर लेखन करतो, त्यामुळ आपल मन हलकं -फुलकं होत.

माझ्या बाबतीत पण अस खूप वेळा होत, जेव्हा माझ्या डोक्यात विचार असतात, तेव्हा मी स्वतःला खूप बोलते, घरातील काम करताना बोलते, आरशासमोर उभी राहून बोलते, एकांतात असताना बोलते, प्रवास करताना बोलते अस सगळ्यांच्याच बाबतीत होत असाव, यामुळ आपल्या मनामध्ये विचारांची खूप गर्दी होते, कालांतराने ते विचार विझून जातात. त्याची राख होते. पुन्हा तेच विचार नव्यानं डोक वर काढतात. विचार करून -करून आपल मन थकत. मग आपल्याला मुक्त व्हाव वाटत. यासाठी आपल्याला ''लिहित होण'' गरजेचे असे मला वाटते.          

आपण लिहितो म्हणजे तरी काय? आपण स्वतःच्या जगण्याला आणि पर्यावरणाला प्रतिसाद- प्रतिक्रिया देत असतो. लोकांनी आपल लेखन स्वीकारलं, नाकारल तरी दोन्ही शक्यता आपल्याला मान्य असतात. स्वीकारण्याबद्दल आनंद मानायचा आणि नाकारण्याबद्दल फेरविचार करून मोकळं व्हायचं! तरच आपण चांगल्या प्रकारे लेखन करू शकतो. बऱ्याच महिलांना लिहाव अस वाटत; पण त्या पेन आणि कागद हातात घेतच नाही.

माणसान कुठेही, कधीही, कसही, आपल्याला जमेल तस, मोडक्या -थोडक्या शब्दात लिहिण्याचा प्रयत्न करावा. सुरुवात करणच महत्त्वाचं! सुरुवातीला तुम्हाला काय लिहाव? असा प्रश्न पडेल; पण जेव्हा तुम्ही सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला एक -एक ओळ आठवत जाईल,'' कारण शब्द देतात समाधान.. शब्द करतात सावधान.. शब्द करतात मनावर गारुड.. आणि होतात विचारावर आरुढ..'' त्यामुळ आपल्या लेखनाला गती यायला लागते.      

ज्या महिलांना लिहिण्याची आवड असते ''ती'' स्वयंपाक करताना लिहिते. रात्री झोपली तरी उठून लिहिते. मुलांचा अभ्यास घेताना लिहिते, प्रवास करताना लिहिते, घरातल्या मंडळींना आवडत नसलं तरी सुद्धा लिहिते; पण लिहितेच! का लिहू नये तिनं. खरं तर पेन आणि वही ''तिनं'' आपल्या जवळच ठेवायला हवा! कारण आपल्याला कधीही कोणत्याही वेळेला कुठलाही विषय सुचू शकतो, त्यावेळेतच लिहिलं, तरच आपले विचार जिवंत राहू शकतात! स्वतःच्या अनुभवातून जे लिहिल जात तेच लेखन प्रभावी ठरत. नंतर लिहू म्हटले, की आपण बऱ्याच गोष्टी विसरून जातो. त्यामुळं आपण खरे लेखन करू शकत नाही आणि ते समाजालाही मान्य होत नाही. पण आम्ही प्रयत्नच करत नाही.

आम्ही फक्त कारण सांगत असतो. वेळच मिळत नाही! मला टायपिंग येत नाही! आमच्या घरी खूप माणसं असतात! मला मुलांच्यातून होत नाही! '' आवड असली की सवड मिळते माणसाला '' जे आतून येत ते कधीच थांबत नाही, कितीही अडचणी असल्या तरी सुद्धा! माणसाच्या भावना कोणत्याही बाहेरील गोष्टीमुळे नाही, तर त्या गोष्टीबद्दल केलेल्या स्वतःच्याच विचारामुळे निर्माण होतात. अनुभवास येणाऱ्या प्रत्येक घटनावर नजर टाकली की लेखनाला नवी दिशा मिळते; आपण जर रोजचं जगण लिहीत गेलो तर ते मनाला खूप समाधान देत.

पण आपण दुसऱ्याच, इकडचं -तिकडचं, ओढून -ताणून, दुसऱ्याची कॉपी करून लिहितो, त्यामुळे आपल्याला खर समाधान लाभत नाही. ते प्रकाशित करायला आपण घाबरतो, खरं तर आपल्याला आलेल्या अनुभवातून लिहावं माणसानं असं मला वाटते.  प्राथमिक शाळेतील, आमचे बुरगुटे गुरुजी रोज एक वाक्य म्हणायचे. '' जनात जा वनात जा, दिवसाकाठी एकदा तरी स्वतःच्या मनामध्ये जा'', असे म्हणून झाल्यानंतर.

शाळा सुटण्याच्या वेळेस आम्हाला सांगायचे. तुम्ही, आज दिवसभरामध्ये काय -काय केल ते उद्या येताना लिहून आणायचे. आम्ही न विसरता लिहून आणायचो. प्रत्येकाचे अनुभव ऐकून खूप हसू यायचं ! तेव्हापासूनच आम्ही खऱ्या अर्थानं लिहिते झालो होतो, असं म्हणायला काही हरकत नाही. आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी महिलांनो, आपण लिहितं होणं गरजेचं!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT