yoga for healthy lifestyle 
लाइफस्टाइल

Yoga Tips : वाढत्या वयात शरीर साथ देईना, ‘योगा से ही होगा’ म्हणा अन् कामाला लागा

yoga for healthy lifestyle: काही गोष्टीत केवळ औषधांवर डिपेंड राहणं शक्य नसतं. तेव्हा योगा कामी येतो

Pooja Karande-Kadam

Yoga Tips in Marathi : वय वाढत असल्याची चाहुल इतरांना लागायच्या आधी तुम्हालाच लागत असते. शरीराचा थकवा, चेहऱ्यावरील सुककुत्या यांपासून सुरूवात होते. आणि शेवट अवयवांच काम करणं कमी होऊ लागतं. त्यामूळे सर्वात जास्त काळजी उतरत्या वयात घ्यावी लागते.

प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये, निरोगी शरीर आणि स्थिर मन प्राप्त करण्यासाठी योगासन आणि प्राणायाम करण्याची शिकवण देण्यात आली आहे. योगशास्त्रात मानवाचे शरीर व मन निरोगी करून आरोग्य जपण्याचे धडे दिले आहेत. 

माणसाचे वय जसजसे वाढते. तसतसे त्याच्या शरीरात वेगवेगळे बदल होऊ लागतात. या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक विविध उपचार पद्धती घेतात, अनेक औषधे खातात, पण तरीही उपाय सापडत नाही. अशावेळी या सर्व समस्यांवर फक्त योगाभ्यास हाच रामबाण उपाय आहे.

आज आपण असे तीन प्रकारचे योगा पाहणार आहोत जे तुम्हाला नवा उत्साह देतील. यामध्ये उत्तानासन, मलासन आणि अध्वश्वासोश्वास

 उत्तानासन

उत्तानासन करण्यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहावे. दीर्घ श्वास घेताना दोन्ही हात वरच्या दिशेला हलवा आणि नंतर श्वास सोडताना हात खाली हलवा. या दरम्यान, पायाच्या बोटांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच स्थितीत परत या. हे आसन केल्याने मन शांत होते आणि यकृताची कार्यक्षमता वाढते. यासोबतच किडनीही चांगले काम करते. स्नायू मजबूत आणि लवचिक असतात.

उत्तानासन

मलासन

मलासन या योगाने मांडीची आणि पोटाची चरबी कमी होते. असे केल्याने शरीर सक्रिय होते. सांध्यांमध्ये लवचिकता येते. मानेभोवती लटकत असलेली चरबी निघून जाते. मलासनव हा स्क्वाटचा एक प्रकार आहे. ज्यामुळे तुमचे नितंब ,सुडौल होतात आणि पोटाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही पहिल्यांदाच मलासनाचा सराव करणार असाल तर भिंत अथवा एखाद्या गोष्टीचा पाठीला आधार घ्या. सरावाने आधाराशिवाय तुम्ही मलासन योग्य पद्धतीने करू शकता. 

मलासन करण्यासाठी शौचाला बसतो तशा अवस्थेत बसावे आणि नमस्कार करताना दोन्ही हातांच्या कोपरांना गुडघ्यापर्यंत स्पर्श करावा. या दरम्यान श्वास हळूहळू आत घ्या आणि बाहेर सोडा. काही वेळ या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा उभे राहा.

मलासन

अधोमुखश्वानासन

अधोमुखश्वानासनाच्या सरावाने पचन सुधारते, रक्ताभिसरण वाढते, ऊर्जा मिळते. हात आणि पाय टोन करण्यासोबतच ते चिंता नियंत्रित करण्याचे काम करते. हे आसन करण्यासाठी, गुडघ्यापासून सुरुवात करून, तळवे खांद्याच्या खाली हलवा आणि गुडघे नितंबांच्या खाली आणा. नंतर नितंब वर करून आपले गुडघे सरळ करा.

अशा प्रकारे तुम्हाला उलटा V आकार बनवावा लागेल. आपले पाय एकत्र ठेवताना टाचांना मजल्यापर्यंत स्पर्श करण्याचा प्रयत्न करा. काही सेकंदांनंतर, ते पुन्हा करा. अधोमुख श्वानासनाचा सराव करण्यापूर्वी व्यावसायिक प्रशिक्षक किंवा वैद्यकीय व्यावसायिकाचा सल्ला घेणे चांगले. 

अधोमुखश्वानासन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

Video Viral: हृदयस्पर्शी! घाबरलेल्या हत्तीच्या पिल्लाची माणसांकडे धाव, व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

ENG vs IND: जो रुटची विकेट 'बॉल ऑफ द सिरीज'! सचिन तेंडुलकरची शाबासकी; विराट कोहलीकडूनही गिलच्या पाठीवर कौतुकाची थाप

SCROLL FOR NEXT