marriage google
लाइफस्टाइल

जातपात, पत्रिका यांना फाटा देत तरुणाई करणार 'जोडीदाराची विवेकी निवड'

सध्या उपलब्ध असलेल्या वधू-वर सूचक मंडळांमध्ये नाव नोंदवल्यावर त्यांच्या विचारसरणीची स्थळे तेथे क्वचितच सापडतात. अशा समविचारी तरुणांना एकत्र आणण्याचे काम 'जोविनी' या व्यासपीठाद्वारे केले जात आहे.

नमिता धुरी

मुंबई : एका बाजूला व्यावहारिक जगात दिसणारं विज्ञान आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबात मिळणारे पारंपरिक संस्कार यांच्या कचाट्यात सापडलेली तरूण पिढी लग्नाळू वयात पोहोचते तेव्हा फारच अडचण होते. सर्व अपेक्षा पूर्ण करणारी स्थळे केवळ पत्रिका जुळली नाही किंवा जात सारखी नाही म्हणून नाकारावी लागतात. अशा अडचणींतून मार्ग काढत अनुरूप आणि प्रगल्भ जोडीदार निवडण्यासाठीचे मार्गदर्शन 'जोडीदाराची विवेकी निवड' या उपक्रमांतर्गत केले जात आहे.

कुंडली, हुंडा, जातपात, इत्यादींना फाटा देत माणूस म्हणून असलेल्या अपेक्षा समोर ठेवत अनुरूप जोडीदार निवडण्याची इच्छा असलेल्या तरूण मुला-मुलींकडे फार कमी पर्याय उपलब्ध असतात. सध्या उपलब्ध असलेल्या वधू-वर सूचक मंडळांमध्ये नाव नोंदवल्यावर त्यांच्या विचारसरणीची स्थळे तेथे क्वचितच सापडतात. अशा समविचारी तरुणांना एकत्र आणण्याचे काम 'जोविनी' या व्यासपीठाद्वारे केले जात आहे.

या उपक्रमांतर्गत तरूण मुला-मुलींच्या मुलाखती घेतल्या जातात. त्यातील काही निवडक तरुणांचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जातो. रोज या ग्रुपवर काही प्रश्न विचारले जातात. त्यावर या ग्रुपचे सदस्य आपली मते व्यक्त करतात. त्यांच्यात चर्चा घडते.

लग्नाविषयीच्या पारंपरिक कल्पना बाजूला ठेवून वास्तव मुद्द्यांवर चर्चा करून, एकमेकांचा नीट परिचय करून घेऊन लग्न करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. व्हॉट्सअॅप उपक्रमाची २२वी बॅच जुलै महिन्यात सुरू होत आहे. त्यासाठी सध्या मुलाखती सुरू आहे.

मुलाखतीसाठी खालील क्रमांकांवर संध्याकाळी ६ नंतर कॉल करावा.

दिक्षा - ९९६०२५८५८९.

हर्षल जाधव, राज्य कार्यवाह - ९६३७३५१४००

हरीश - ९४०३६१८३७५

माधुरी - ९४२३४२०२६३

सचिन - ८४२४०४११५९

आरती - ८६५२२२३८०३

कृष्णात - ८६००२३०६६०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live : श्रेयस अय्यरचा अजंबित करणारा निर्णय; शुभमन गिलच्या संघाला दिली आयती संधी, जाणून घ्या संघांची Playing XI

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

SCROLL FOR NEXT