no evm sakal
लोकसभा २०२४

Bhiwandi Lok Sabha: कल्याणमध्ये आदिवासी बांधवांचा मतदानावर बहिष्कार! 'या' कारणामुळं वैतागले नागरिक

निवडणुकीनिमित्त तरी हे गाव आणि तिथले ग्रामस्थ चर्चेत आले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

कल्याण : ठाणे जिल्ह्यातल्या कल्याण तालुक्यातील एका गावातील प्राथमिक गरजाही पूर्ण झालेल्या नसल्यानं इथल्या आदिवासी बांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं निवडणुकीनिमित्त तरी हे गाव आणि तिथले ग्रामस्थ चर्चेत आले आहेत. (Bhiwandi Lok sabha tribals boycott voting in Kalyan Citizens are upset because of bad condition of road)

कल्याण तालुक्यातील पोई या आदिवासीबहुल गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. पोई हे गाव खरंतर भिवंडी लोकसभा मतदारसंघात येतं. पोई गावातील आदिवासी पाड्याकडं जाणाऱ्या रस्त्याचं काम रखडल्यानं आणि वारंवार याबाबत तक्रार करुनही कामं झालेली नसल्यानं इथल्या नागरिकांनी मतदानावर बहिष्काराचा निर्णय घेतला आहे.

आज ठाणे जिल्ह्यातील तिनही लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान पार पडत आहे. यामध्ये ठाणे लोकसभा, कल्याण लोकसभा आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचा समावेश होते. याठिकाणी ठाण्यात शिंदे सेनेचे नरेश म्हस्के विरुद्ध ठाकरे सेनेचे राजन विचारे यांच्यात प्रमुख लढत होत आहे. तर कल्याणमध्ये शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे आणि ठाकरे सेनेचे वैशाली दरेकर यांच्या लढत होत आहे. तर भिवंडीत भाजपचे कपिल पाटील, मविआचे सुरेश म्हात्रे आणि बसपाचे मुमताज अन्सारी यांच्यात लढत होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अरे ही मूर्ख आहे, हिला अक्कल आहे का... आठवणी सांगताना माधवी निमकरला अश्रू अनावर, म्हणाली, 'मी कधीच त्यांना उत्तर दिलं नाही पण..

PMC News : कामचुकार अधिकाऱ्यांना घरी बसविणार : आयुक्त नवलकिशोर राम

Kiran Navgire Fastest Century: १४ चौकार, ७ षटकार अन् फक्त ३४ चेंडूत शतक! महाराष्ट्राच्या किरणने रचला वर्ल्ड रेकॉर्ड; पाहा Video

BCCI अफगाणिस्तानसोबत! पाकिस्तानच्या हल्ल्यात जीव गमावणाऱ्या तिन्ही क्रिकेटपटूंबद्दल व्यक्त केला शोक

Pune City: पुण्यातली दुरवस्था बघून आयुक्त संतापले; सहाय्यक आयुक्तांची केली उचलबांगडी, तिघांचं निलंबन

SCROLL FOR NEXT