Sangli LokSabha Elections esakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha : 'आमचाच आमदार अन्‌ खासदार’ सूत्र यंदाही जमणार की बिघडणार? संजय पाटील तिसऱ्यांदा 'लोकसभे'साठी सज्ज

संजय पाटील तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

रवींद्र माने

रोहित पाटील, प्रभाकर पाटील हे दोघे येत्या विधानसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. दोघांतील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे.

तासगाव : तासगाव (Tasgaon) तालुका होमपीच असलेले भाजपचे खासदार संजय पाटील (Sanjay Patil) तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी (Sangli Loksabha Election) सज्ज झाले असताना त्यांच्या समोर कोण, याची उत्कंठा वाढली आहे. गत दोन निवडणुकांमध्ये आमचाच आमदार, आमचाच खासदार, असे सूत्र जमले होते. यावेळी ते पुन्हा घडणार की बिघडणार, याकडे लक्ष लागले आहे.

संजय पाटील तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत. तासगाव तालुका हा त्यांचा बालेकिल्ला. २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (NCP) आर. आर. पाटील हयात असताना संजय पाटील यांनी तालुक्यातून प्रतीक पाटील यांच्या विरोधात, तर २०१९ च्या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार निवडून विशाल पाटील यांच्या विरोधात तालुक्यातून एकहाती आघाडी घेतली होती.

दोन्ही निवडणुकांमध्ये अपवाद वगळता आर. आर. पाटील गट संजय पाटील यांच्या मागे गेल्याचे चित्र दिसले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी खासदार गट आमदार सुमन पाटील यांच्या मागे उभा राहिल्याचे दिसले होते. पोटनिवडणुकीतही खासदार गटाने सुमन पाटील यांच्या विरोधात उमेदवार दिलेला नव्हता. परिणामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील खासदार, आमदार यांच्यातील ‘समझोता राजकारणा’ची टीका अगदी परवापर्यंत ऐकू येत होती.

खासदार संजय पाटील तालुक्यातील उमेदवार असल्याने आपला उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीतील आघाडी धर्म आणि आदेश डावलून राष्ट्रवादी कार्यकर्ते आणि मतदार खासदार पाटील यांच्या मागे गेल्याचे चित्र मागील दोन लोकसभा निवडणुकीत दिसले होते. आता या वेळी काय होणार? कदाचित मागील पुनरावृत्ती की आघाडी धर्म पाळला जाणार, हे आज सांगणे कठीण असले, तरी पंचायत समिती नव्या इमारतीच्या बांधकामाचे नुकतेच भूमिपूजन पार पडले. यावेळी खासदार, आमदार दोघेही एकाच व्यासपीठावर होते. समोर दोन्ही गटाचे आजी-माजी पदाधिकारी होते, त्या वेळी झालेल्या खासदारांच्या भाषणाने ‘ती’ चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

दोन युवा नेते आमने-सामने

दुसरीकडे, गत दोन-अडीच वर्षांत दोन्ही पक्षांतील विरोधाची धार पुन्हा तीव्र झाली आहे. मतदार संघातील वेगवेगळ्या मुद्द्यांवर दोन्ही पक्ष अनेकदा हमरीतुमरीवर आल्याचे चित्र दिसले आहे. रोहित पाटील, प्रभाकर पाटील हे दोघे येत्या विधानसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. दोघांतील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीत चित्र काय असणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

बलाबल

  • जिल्हा परिषद भाजप २ राष्ट्रवादी ४

  • पंचायत समिती भाजप ५ राष्ट्रवादी ७

  • नगरपालिका भाजप १२ राष्ट्रवादी ६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ७ महिने झाले अनाथांना मिळाले नाहीत बालसंगोपन योजनेचे पैसे; राज्यातील सव्वालाख चिमुकल्यांचे हाल; दरमहा अपेक्षित आहेत २२५० रुपये

आजचे राशिभविष्य - 4 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीत एक फुटाने वाढ, ५० बंधारे पाण्याखाली

अग्रलेख : मूक आक्रंदनाचा वारसा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 4 जुलै 2025

SCROLL FOR NEXT