EVM and VVPAT esakal
लोकसभा २०२४

Hatkanangale Lok Sabha : सोशल मीडियावर 'तो' फोटो व्हायरल करणे पडले महागात; तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ व्हायरल केला.

सकाळ डिजिटल टीम

पन्हाळा तालुक्यातील सातार्डे मतदान केंद्रावर अज्ञाताने मतदान केंद्रात मोबाईल नेऊन व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला.

इचलकरंजी : शहरात अनेकजणांनी मतदान करतानाचा ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटसोबतचा फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हे फोटो व्हायरल करणे दोन तरुणांना महागात पडले आहे. एका अज्ञात इन्स्टाग्राम अकाउंटधारक तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station) तर रामचंद्र शिवाजी कांबळे (वय २७, रा. खोतवाडी) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात (Shahapur Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर फोटो व व्हिडिओ शेअर करत आचारसंहितेचा भंग केला.

शाहू पुतळानजीक विठ्ठल रामजी शिंदे शाळा नंबर २१ मध्ये २५३ मतदान केंद्र आहे. याठिकाणी एकाने मतदान केंद्रात मोबाईल बंदी असताना मोबाईलसह प्रवेश केला. मतदानाच्या (Voting) गुप्त प्रक्रियेकडे दुर्लक्ष केले आणि मतदान करतानाचा व्हिडिओ करत सोशल मीडियावर प्रसारित केला. तरुणाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ व्हायरल केला. हे निदर्शनास आल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष दादासाहेब पांडुरंग देसाई (वय ५५) यांच्या फिर्यादीनुसार ‘त्या’ तरुणावर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तसेच खोतवाडी (ता. हातकलंगले) येथील मतदान केंद्र क्र. २४ मध्ये असाच प्रकार घडला. रामचंद्र कांबळे याने मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जात मतदान केल्याचा फोटो काढला. हे फोटो त्याने इंस्टाग्रामवरील आपल्या अकाउंटवर स्टेटस ठेवला. हे पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल आसिफ कलायगार यांच्या फिर्यादीनुसार कांबळे याच्यावर शहापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला.

पन्हाळ्यात अज्ञातावर गुन्हा

पन्हाळा : तालुक्यातील सातार्डे मतदान केंद्रावर अज्ञाताने मतदान केंद्रात मोबाईल नेऊन व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. याबाबत मतदान केंद्रप्रमुख बंडा कुंभार यांनी पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT