Loksabha Election 2024 sakal
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024 : दशकांनंतर नक्षलग्रस्त भागातील नागरिक प्रथमच करणार मतदान

देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीने आता चांगलाच वेग घेतला आहे. झारखंडमधील नक्षलग्रस्त सिंहभूम जिल्ह्यातील काही दुर्गम भागांत यंदाच्या निवडणुकीत प्रथमच किंवा काही दशकांनंतर मतदान होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

रांची : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तयारीने आता चांगलाच वेग घेतला आहे. झारखंडमधील नक्षलग्रस्त सिंहभूम जिल्ह्यातील काही दुर्गम भागांत यंदाच्या निवडणुकीत प्रथमच किंवा काही दशकांनंतर मतदान होणार आहे. साल वृक्षांचा आशियातील सर्वांत घनदाट जंगलाचा परिसर असणाऱ्या सारंदामध्ये राहणारे मतदार यंदा प्रथमच मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी हेलिकॉप्टरमधून मतदान साहित्य आणले जाईल. त्याचप्रमाणे, निवडणूक कर्मचारीही हवाई मार्गे येथे पोचणार आहेत. मतदानासाठी एकूण ११८ मतदान केंद्रे उभारण्यात येतील.

पश्चिम सिंहभूमचे उपायुक्त आणि जिल्हा निवडणूक अधिकारी कुलदीप चौधरी ‘पीटीआय’शी बोलताना म्हणाले, की एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत. सिंहभूम जिल्ह्यात अनेक गावे अशी आहेत की जिथे पहिल्यांदाच किंवा जवळपास दोन दशकांच्या अंतरानंतर निवडणूक होणार आहे.

नक्षलवादी कारवाया तीव्र असल्याने ही गावे आतापर्यंत मतदानापासून दूर राहिली. परिस्थिती सुधारूनही पश्चिम सिंहभूम देशातील सर्वांत नक्षलग्रस्त भागांपैकी एक राहिला. गेल्या वर्षभरात या ठिकाणी नक्षलवादाशी संबंधित ४६ घटना घडल्या. त्याचप्रमाणे, सुमारे २२ जणांचा मृत्यू झाला. यंदाच्या निवडणुकीत मिडल स्कूल, नुगडी आणि मध्य विद्यालय, बोलेरो आदी मतदान केंद्रावर प्रथमच मतदान होईल.

रोबोकेरा, बिनी, रोम, थालकोबाद, हंसाबेडा आणि छोटा नगर आदी ठिकाणी हवाई मार्गे निवडणुकीचे साहित्य आणले जाईल. काही ठिकाणी निवडणूक कर्मचाऱ्यांना चार ते पाच कि.मी. अंतरही चालावे लागेल. यावेळी मतदानापासून कोणताही भाग वंचित राहू नये, याची काळजी आम्ही घेत आहोत. थालकोबाद व इतर दोन डझन गावांना यापूर्वी ‘मुक्त क्षेत्रे’ असे संबोधले जात होते. या गावांत प्रशासनाचे अस्तित्वच नव्हते. मात्र, सुरक्षा दलांच्या ‘ऑपरेशन ॲनाकोंडा’सह इतर धडक मोहिमांमुळे प्रशासनाला पुन्हा स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यात यश आले.

या प्रदेशात सुरक्षा दलाच्या एकूण १५ छावण्या वसविण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.निवडणूक कर्मचारी हेलिकॉप्टरव्यतिरिक्त रेल्वे व रस्तामार्गेही पोचतील. १२१ पथके रेल्वेने पाठविली जाणार असून त्याची चाचणीही घेण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी सर्व पथके पहाटे साडेपाच वाजेपर्यंत पोचतील.

या मतदारसंघांत ६२ मतदार शतायुषी आहेत, असेही चौधरी म्हणाले. त्यापैकी मतदान केंद्रापर्यंत चालत न येऊ शकणाऱ्या मतदारांना घरूनच मतदान करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

मतदानवाढीसाठी प्रयत्न

सिंहभूममध्ये घनदाट जंगलात राहणाऱ्या मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रशासन अनोखे उपाय करत आहे. यात, १०० फूट उंचीवर मोठा बलून उभारण्यात आला असून १,२८४ ‘चुनाव पाठशाला’ही उभारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune-Mumbai Train Cancelled : पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सर्व रेल्वे गाड्या रद्द, पाहा संपूर्ण यादी

Post Office Scheme: रोज फक्त 50 रुपये गुंतवा आणि मिळवा तब्बल 35 लाखांचा फंड; काय आहे योजना?

Rain-Maharashtra Latest live news update: कोल्हापूर ब्रेकिंग : मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली, तिघे जखमी

रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट म्हणजे काय रे भाऊ? अर्थ आणि महत्त्व जाणून घ्या...

Solapur Rain Update: मुंबईत मुसळधार! ‘वंदे भारत’ रद्द, ‘सिद्धेश्वर’ मुंबईऐवजी पुण्यातून; रेल्वेगाड्या उशिरा सुटल्याने प्रवासी त्रस्त

SCROLL FOR NEXT