congress party esakal
लोकसभा २०२४

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये अनेक इच्छुकांना तिकीटं मिळतात तर अनेकांना मिळत नाहीत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Loksabha Election 2024 : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये तिकीटांसाठी अनेकजण इच्छुक असतात, पण ज्यांना तिकीट मिळतं ते खरंच स्वतःला भाग्यवान समजतात. पण काँग्रेसच्या बाबतीत मात्र सध्या असं घडताना दिसत नाहीए. कारण काँग्रेसच्या आणखी एका उमेदवारानं आपलं लोकसभेचं तिकीट पक्षाला परत दिलं आहे. याचं त्यानं सांगितलेलं कारणही विचार करायला लावणार आहे. पण त्यामुळं काँग्रेसवर नामुष्की मात्र ओढवली आहे. (Congress candidate from Puri Sucharita Mohanty returned ticket because party was not able to fund her)

पक्षानं निधी देऊ शकत नाही सांगितलं

पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार सुचरिता मोहंती यांनी पक्षाला लोकसभेचं तिकीट परत केलं आहे. मोहंती म्हणतात, "पक्ष मला निधी देऊ शकला नाही म्हणून मी तिकीट परत केलं आहे. दुसरं कारण म्हणजे 7 विधानसभा मतदारसंघांतील काही जागांवर विजयी उमेदवारांना तिकीट दिलं गेलं नाही. त्याऐवजी, काही कमकुवत उमेदवारांना तिकीट मिळालं त्यामुळं मी अशा परिस्थितीत मला प्रचारणंही शक्य वाटत नाही. (Latest Marathi News)

मागणीकडं पक्षानं लक्ष दिलं नाही

जेव्हा मी माझं तिकीट परत केला तेव्हा मला पक्षाकडून कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाकडून मला निधी मिळू शकत नाही त्यामुळं मी स्वतःचं माझा निधी उभारायला मला सांगितलं गेलं. याशिवाय माझं पक्षश्रेष्ठींशी विशेष बोलणं झालेलं नाही. केवळ विधानसभेच्या जागांवर चांगले उमेदवार द्या अशी मागणी मी केली. (Marathi Tajya Batmya)

पण त्याचीही पक्षानं दखल घेतलेली नाही. मला दुसऱ्या पक्षांबाबत माहिती नाही. पण जेव्हा त्यांच्याकडं कोणी तिकीट मागतं तेव्हा ते देताना अतिशय लोकशाही पद्धतीनं आणि केंद्रीय नेतृत्वाकडून लक्ष घालून दिलं जातं, असंही मोहंती यांनी म्हटलं आहे.

या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार

यंदा काँग्रेसची स्थिती वेगळी आहे कारण भाजप सरकारनं काँग्रेसच्या सर्व प्रकारच्या निधीवर निर्बंध आणले अकाऊंट्स फ्रीज केले. एकूणच भाजप सरकारला काँग्रेसनं चांगल्याप्रकारे प्रचार करता येऊ नये यासाठी ही खेळी केली आहे. त्यामुळं पक्ष आपल्या उमेदवारांना निधी देण्यास असमर्थ आहे.

मी माझ्या प्रचारासाठी कोणी निधी देतंय का? यासाठी प्रयत्न केले पण ते होऊ शकलं नाही. त्यामुळं दिवस कमी असताना हे सर्व घडवून आणणं कठीण आहे. मला साध्या पद्धतीनं प्रचारच करावा लागला असता पण वेळ कमी असल्यानं आता हे सर्वकाही शक्य नाही, अस सांगत मोहंती यांनी पक्षाला तिकीट परत देऊ केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री घायवळ गँगचा धुमाकूळ; गोळीबारात एक जण गंभीर जखमी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

माेठी बातमी! 'शिरवळमध्ये भरदिवसा गाेळीबार'; घटना सीसीटीव्‍हीत कैद, तिघांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ, नेमकं काय घडलं..

Chh. Sambhajinagar Accident : माळीवाडा पुलावर भीषण अपघात, भरधाव कंटेनरखाली दुचाकीस्वाराचा जागीच मृत्य

सरकारचा मोठा निर्णय! आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ‘या’ लाखो लोकांचे जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार आणि पोलिसांकडून दाखले जप्त होणार, नेमका आदेश काय?, वाचा...

Swami Samarth: स्वामी समर्थ महाराज स्वत: आशीर्वाद देताना... AI VIDEO व्हायरल, दर्शन चुकवू नका

SCROLL FOR NEXT