Uddhav Thackeray sakal
लोकसभा २०२४

Uddhav Thackeray : ''नुसतं बाळासाहेब म्हणू नका...'' उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना धाराशिवमधून सल्ला

संतोष कानडे

Loksabha election : धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचारसभेसाठी उद्धव ठाकरेंची उपस्थिती होती. धाराशिवमध्ये आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीकास्र डागलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, २०१४ मध्ये तुम्ही युती तोडलीत आणि २०१९ मध्येही तुम्हीच धोका दिलात. आज तुम्ही स्व. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेता परंतु नाव घेताना नुसतं बाळासाहेब म्हणू नका, त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणा. असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी-शाहांना सल्ला दिला.

''बाळासाहेबांचं कर्जय हे माहितंय तर मग त्यांच्याच खोलीत तुम्ही दिलेला शब्द कसाकाय मोडता. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पदाचं ठरलेलं असताना भाजपने तो शब्द पाळला नाही.'' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी आपण जय भवानी, जय शिवाजी म्हणणार असल्याचं स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी धाराशिवमध्ये आले परंतु त्यांनी तुळजाभवानीचं दर्शन घेतलं नाहीत. देवीबद्दल ते दोन शब्दही बोलले नाहीत. माझ्यावर काय कारवाई करायची ती करा पण मी जय भवानी, जय शिवाजी सोडणार नाही. आयोगाने आमच्यावर कारवाई केली तर याद राखा उद्या आमचं म्हणजे इंडिया आघाडीचं सरकार येतंय, त्यानंतर आम्ही बघून घेऊ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Doctor Death Case: हत्या की आत्महत्या? एका वेलांटीवरुन डॉक्टर युवतीचं मृत्यू प्रकरण उलगडण्याची शक्यता

Share Market Closing : फेडरल रिझर्व्हच्या निर्णयाआधी सेन्सेक्स 369 अंकांनी वधारला; तर निफ्टी निर्देशांक 26,000 वर, जाणून घ्या कोणत्या शेअर्सने दिले सर्वाधिक परतावे

Latest Marathi News Live Update : ८५ देशांची भागीदारी, शिपिंग क्षेत्रात नवे करार; मोदी म्हणाले, भारतील सागरी क्षेत्रावर वाढतोय जगाचा विश्वास

SBI Job Vacancy 2025: SBI जॉब अलर्ट! स्पेशालिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू, पॅकेज तब्बल 1.35 कोटी

बिग बॉस 19 साठी सलमानला मिळतं 150-200 कोटी मानधन ! निर्मात्याचा धक्कादायक खुलासा "आम्ही भांडतो पण.."

SCROLL FOR NEXT