NOta 
लोकसभा २०२४

Indore Lok Sabha Result: इंदौरमध्ये NOTAचा बोलबाला; भाजप उमेदवाराला जोरदार टक्कर; 2 लाखांहून अधिक मतांची नोंद

लोकसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल समोर येत आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल सध्या समोर येत आहेत. मध्य प्रदेशातील इंदौर इथं एक वेगळाच विक्रम पहायला मिळाला आहे. यामध्ये भाजपची एकतर्फी लढत सुरु आहे. पण चक्क नोटानं त्यांना जोरदार आव्हान दिलं आहे. कारण नोटानं २ लाखांहून अधिक मतं घेतली आहेत. या जागेवर काँग्रेसचा उमेदवार अक्षय कांती बम यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजपत प्रवेश केला होता. (Indore Lok Sabha 2024 NOTA dominance strong fight with BJP candidate NOTA got more than 2 lakh votes)

यानंतर अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर काँग्रेस दुसऱ्या कोणाला आपला उमेदवार बनवू शकलं नाही. पण काँग्रेसनं यासाठी भाजपलाच जबाबदार धरलं आहे. काँग्रेसनं या ठिकाणी म्हटलं की, भाजपनं इंदौरच्या मतदारांकडून त्यांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेतला आहे. भाजपवर लोकशाही नष्ट करायचा आरोपही लावला होता.

यानंतर काँग्रेसनं एक अजब कॅम्पेन चालवलं आणि इंदौरच्या मतदारांना नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलं. इतकंच नव्हे काँग्रेसनं शहरांमधील भिंतींवर नोटाला मतदान करण्याचं आवाहन केलं होतं. तसेच रिक्षांवरही नोटाला मतदान करण्याचं आवाहन करण्याचे पोस्टर लावले होते.

यावर भाजपनं मोठा आक्षेप घेतला होता. भाजपनं म्हटलं होतं की, काँग्रेस लोकांना नोटावर मतदान करण्यास सांगून लोकशाहीची थट्टा उडवली होती. तरीही इंदूरमध्ये काँग्रेसच्या या आवाहनाचा परिणाम पहायला मिळाला. कारण काँग्रेसच्या आवाहनानंतर नोटाला इथं २ लाख मत पडली आहेत. हा पण एक नवा विक्रमच ठरला आहे. या ठिकाणी सध्या भाजपचे उमेदवार शंकर लालवानी हे मतांच्या मोजणीत आघाडीवर आहेत पण नोटा त्यांच्या पाठलाग करत आहे. असंही सांगितलं जात आहे की मतमोजणी पूर्ण होईलप्रयंत नोटा अजून पुढे जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT