Bajarang Sonawane 
लोकसभा २०२४

Bajarang Sonawane: "जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला"; विजयाचा गुलाल उधळल्यानंतर बजरंग सोनावणेंनी व्यक्त केल्या भावना

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या तगड्या उमेदवाराला जोरदार लढत देत बजरंग सोनावणे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत मोठा विजय मिळवला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

बीड लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या तगड्या उमेदवाराला जोरदार लढत देत बजरंग सोनावणे यांनी अत्यंत चुरशीच्या लढतीत मोठा विजय मिळवला. या विजयानंतर त्यांनी गुलाल उधळला आणि माध्यमांशी संवाद साधला. बीडमध्ये जरांगे फॅक्टर शंभर टक्के कामाला आला असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.

सोनावणे म्हणाले, "बीड जिल्ह्यातील ज्या तमाम जनतेनं मला आशीर्वाद दिला आहे, या मायबाप जनतेचा मी आभारी आहे. बीड जिल्ह्यातील जनता सत्यवादी आहे आणि हा विजय सत्याचा आहे. शेवटच्या नाही तर चार फेऱ्यांमध्येच माझा विजय झाला होता. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की, बजरंग सोनावणे हाच चार तारखेला खासदार असणार आहे"

"माझ्या सारख्या एका गरीबाच्या पोरगा एका धनदांडग्या विरोधात मी खासदार झालो याचा अभिमान आहे आणि याचं श्रेय कोणाला जर द्यायचं झालं तर बीड जिल्ह्यातील जनतेला द्यायचं आहे. बीडच्या जनतेनं ही निवडणूक डोक्यावर घेतली होती. माझे ५५ हजार मतं बाहेर गेलं नाहीतर माझा विजय यापेक्षाही जास्त मतानं झाला असता. जेवढी सत्ता वापरायची ती वापरली गेली आणि जे काही करायचं ते केलं पण बीड जिल्ह्यातील जनतेनं मला विजयी केलं" असंही यावेळी बजरंग सोनावणे यांनी म्हटलं.

जरांगे फॅक्टर इथं शंभर टक्के कामाला आला, असं सांगताना सोनावणे म्हणाले, मी असं कधीही बोललो नाही की जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणासाठी चाललेल्या चळवळीचा मला निवडणुकीत फायदा होईल. पण मी हा आरक्षणाचा विषय दिल्लीपर्यंत मांडणार. यशाचं श्रेय मी बीड जिल्ह्यातील जनतेला देतो, असंही सोनावणे यावेळी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT