Haribhau Jawale-Raksha Khadse  esakal
लोकसभा २०२४

किस्से निवडणुकीचे! हरिभाऊंचा गेम झाला अन् एकनाथ खडसेंच्या सुनबाई खासदार झाल्या

२०१४ मध्ये भाजपच्या पहिल्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव जाहीर झाले. हरिभाऊ तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न पाहत होते....

Sandip Kapde

रावेर लोकसभा मतदारसंघ... सन २०१४ ची लोकसभा निवडणूक...अन् एकनाथ खडसेंची हवा...कारण एकनाथ खडसेंमुळे जाहीर झालेली उमेदवारी रद्द झाली होती...

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीचा हा किस्सा... रावेर मतदारसंघ राज्यभरात नेहमीच चर्चेत असतो. त्याचे कारण शरद पवार गटाचे विद्यमान आमदार आणि भाजपच्या वाटेवर असलेले एकनाथ खडसे....

२०१४ मध्ये भाजपच्या पहिल्या यादीत रावेर लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांचे नाव जाहीर झाले.  हरिभाऊ  तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न पाहत होते....मात्र त्यांचा घात झाला...कारण एकनाथ खडसेंनी चान्स मारला...

हरिभाऊ प्रचाराच्या मैदानात उतरले....ते लोकांना भेटत होते.. परंतु, याच काळात त्यांच्याबद्दल मतदारसंघात नाराजीचे वातावरण तयार झाले. मतदारसंघातील काही पदाधिकाऱ्यांनी केंद्रातील नेत्यांजवळ नाराजी बोलून दाखवली.

त्यानंतर एकनाथ खडसे मैदानात आले... खडसे कुटुंबातील कुणी निवडणुकीत असते तर मजा आली असती, असं त्यांनी केंद्रीय नेत्यांना सांगितलं. त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाचे मन बदलले. त्यामुळे, जावळेंची जाहीर झालेली उमेदवारी रद्द झाली अन् एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली.  निवडणुकीत रक्षा खडसेंचा तीन लाखांच्या मताधिक्याने विजय झाला. केंद्रात प्रथमच भाजप पूर्ण बहुमतासह सत्तेत आलं.

स्वत: खासदार न होण्याची वेदना हरिभाऊ लपवू शकले नाही. ‘देख के दुनिया की दिवाली.. दिल मेरा चुपचाप जला..’ हे गायक मुकेश यांच्या आवाजातील गीत म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. अशा प्रकारे हरिभाऊंचा खासदार होण्याचा हॅट्रीक चान्स एकनाथ खडसेंनी उधळला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Driverless Car Photos : टेस्ला, क्रुज सारख्या कंपन्या मागे पडल्या; बंगळुरूमध्ये बनली भारतातली पहिली ड्राइवरलेस कार, पाहा फोटो

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ बंदोबस्त; चौफेर ‘बॅरीकेटिंग’, रामगिरीवरही सुरक्षा बंदोबस्त

'रात गई बात गई' ट्विकल खन्ना तिच्या अजब वक्तव्यामुळे ट्रोल, म्हणाली...'शारीरिक धोका इतका त्रासदायक नसतो'

Viral Video : अरेरे वर्दीला लाज आणली ! पोलिस उपअधीक्षकानेच मैत्रिणीच्या घरात केली चोरी, मोबाईल अन् दोन लाख घेऊन फरार, व्हिडिओ समोर

Love Affair Crime : पहिली भेट ते संबंध ठेवण्याच्या बहाण्याने हत्या; अमृतानं रामकेशला कसं आणि का संपवलं? वाचा A to Z स्टोरी

SCROLL FOR NEXT