lok sabha poll sakal
लोकसभा २०२४

अर्धांगिनींच्या खांद्यावर प्रचाराची धुरा; ज्योतिरादित्य आणि नकुलनाथ यांच्यासाठी ‘त्या’ निवडणुकीच्या मैदानात

मतदानाची तारीख जवळ येत असताना राजकीय प्रचारमोहिमांना वेग आला आहे. मध्य प्रदेशमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचा समावेश होतो.

सकाळ वृत्तसेवा

भोपाळ : मतदानाची तारीख जवळ येत असताना राजकीय प्रचारमोहिमांना वेग आला आहे. मध्य प्रदेशमध्ये प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांचा समावेश होतो.

हे दोघे आपापल्या पक्षाचेही प्रमुख नेते असल्याने इतर मतदारसंघांमध्येही त्यांना प्रचारासाठी जावे लागत आहे. अशावेळी या दोघांच्या अर्धांगिनींनी प्रचारात उडी घेतली आहे. राजघराण्यातील ज्योतिरादित्य शिंदे यांच्या पत्नी प्रियदर्शनी राजे शिंदे आणि श्रीमंत उमेदवारांपैकी एक असलेले नकुलनाथ यांच्या पत्नी प्रिया नाथ या दोघींनी आपापल्या पतींची प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे.

रणरणत्या उन्हात त्या प्रचारफेऱ्या काढत घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. मतदारांना जाऊन भेटणे, भजन गाणे, छोट्या दुकानदारांच्या भेटी-गाठी घेणे यासाठी त्या वेळ तर देतच आहेत, शिवाय शेतामध्ये उतरून शेतकऱ्यांच्या कामातही त्यांना हातभार लावत आहेत.

छिंदवाडाचे खासदार असलेले नकुलनाथ पुन्हा याच मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. माझ्या पतीला मतदारांनी साथ द्यावी, अशी विनंती करत प्रिया नाथ या सामान्य नागरिकांच्या भेटी घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच नवेगाव या ग्रामीण भागात जाऊन त्यांनी ग्रामस्थ महिलांबरोबर पारंपरिक नृत्य केले, शेतात उतरून कापणी केली.

प्रियदर्शनी या बडोद्याच्या राजघराण्यातील आहेत. त्यांनीही पती ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रचारासाठी पायाला भिंगरी लावली आहे. गुना मतदारसंघातील गावागावांमध्ये त्या प्रचार करत आहेत.

लढत सोपी नाही

राजघराण्यांचे आणि उमेदवारांच्या श्रीमंतीचे मतदारांना पूर्वी इतके आकर्षण उरलेले नाही. त्यामुळेच ज्योतिरादित्य व नकुलनाथ यांना नियोजनबद्ध प्रचार करावा लागत आहे. ज्योतिरादित्यांचा मागील लोकसभा निवडणुकीत गुनामधून पराभव झाला होता. तर मागील निवडणुकीत भाजपला छिंदवाडा येथे यश मिळाले नसल्याने भाजपने येथे यंदा बराच जोर लावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi : साई बाबांच्या नगरीत हे काय सुरुय? संस्थानच्या 47 अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; शिर्डीत मोठी खळबळ, धक्कादायक कारण समोर, पाहा VIDEO

Suryakumar Yadav: '... तर मला भारताच्या वनडे संघाचंही कर्णधारपद मिळालं असतं', सूर्यकुमार नेमकं काय म्हणाला? वाचा

Latest Marathi News Live Update : धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

दिवाळी गिफ्ट काय द्यावं हेसुद्धा कळेना! पंढरपूर विठ्ठल मंदिरातील सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिला चिकन मसाला, BVG कंपनीचा अजब कारभार

Pune - Nashik हायवेवर 'ट्राफिक जाम'ची दिवाळी! प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा; VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT