लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: गुजरात ते उत्तर प्रदेशात भाजपसाठी ठाकुरांचं मोठं आव्हान; समाजाची काय आहे नाराजी?

उत्तर भारतातील भाजपची ही मोठी वोट बँक जर नाराज झाली तर लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान सोसावं लागू शकतं.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरात यांसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये ठाकूर किंवा क्षत्रिय समाज ही भाजपची मोठी ताकद असल्याचं मानलं जातं. भाजपचा ही मोठी वोट बँक आहे. योगी आदित्यनाथ यांच्यासारखा नेता भाजपचा पहिल्या फळीतील नेता बनल्यानं भाजपची ही वोट बँक अधिकच घट्ट झाली आहे.

पण आता भाजपासाठी धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. कारण उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकुरांची पंचायत पार पडली. यामध्ये भाजपविरोधात वातावरण पहायाला मिळालं. यामध्ये सहारनपूरमधील ननौत गाव, मेरठच्या कपसेडा आणि गाजियाबादच्या धौलाना या ठिकाणी या पंचायती भरवण्यात आल्या होत्या. (Loksabha Election 2024 Thakur big challenge for BJP from Gujarat to Uttar Pradesh hindi belt)

याशिवाय जेवर भागात देखील गेल्या काही दिवसांत पंचायत झाल्या. या पंचायतीत पश्चिम उत्तर प्रदेशशिवाय हरयाणा, राजस्थान आणि दिल्लीहून मोठ्या संख्येनं राजपूत समजाचे लोक आले होते. या पंचायतीत मेरठ आणि सहारनपूर विभागात एकाही ठाकूर नेत्याला लोकसभा तिकीट न दिल्यानं आक्षेप घेण्यात आला. ठाकूर समाजाच्या बैठकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांना आवाहन करण्यात आलं होतं की, त्यांनी ठाकूर समाजाकडं दुर्लक्ष करु नये. पण सत्तेत असलेल्या भाजपविरोधात त्यांना सर्वाधिक राग आहे. (Latest Marathi News)

या पंचायतींचं आयोजन करणाऱ्या नेत्यांनी म्हटलं की, सहारनपूरपासून नोयडापर्यंत एकाही ठाकूर नेत्याला तिकीट न दिल्यानं त्यातून चुकीचा संदेश गेला आहे. त्यामुळं आम्ही भाजपला आमची ताकद दाखवू इच्छित आहोत. यापूर्वी गाजियाबादमधून व्ही. के. सिंह खासदार होते तेव्हा या भागातून त्यांचं एक प्रतिनिधीत्व होतं. (Marathi Tajya Batmya)

पण आता त्यांचंही तिकीट कापल्यानं ठाकूर समाजात नाराजी आहे. मुरादाबाद विभागात सर्वेश सिंह यांना तिकीट मिळालं आहे. पण मेरठ आणि सहारनपूर विभागातून संधी न मिळाल्यानं नाराजी वाढली आहे. इतकंच नव्हे तर मोदी सरकारचे मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांचं तिकीट कापण्याचा अल्टिमेटमही देण्यात आला होता. (Latest Maharashtra News)

तर हरयाणा आणि पश्चिम युपीमध्ये ठाकूर समाजाच्या रागाचं कारण म्हणजे सम्राट मिहिर भोज यांना गुर्जर असं संबोधलं गेलं. क्षत्रियांचं म्हणणं आहे की, आम्ही कधीही त्यांच्याविषयी जातीय गौरवाची गोष्ट केली नाही. पण एका राजपूत राजाला गुर्जर असल्याचं सांगणं योग्य नाही. या प्रकारामुळं नोएडात राजपूत आणि गुर्जर समाज आमने-सामने आला होता. त्यांचाही राग इथं दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT