Lok Sabha Result 2024  esakal
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Result 2024 : राज्यामध्ये मराठ्यांचे 26 खासदार; ओबीसी, एससी-एसटी किती?

राज्यामध्ये कुठल्या समाजाचे किती खासदार निवडून आले, याची आकडेवारी बघितली असता ४८ पैकी २६ जागांवर मराठा उमेदवार विजयी झालेले आहेत. तर ९ ओबीसी खासदार, ६ अनुसूचित जातींचे खासदार आणि ४ अनुसूचित जमातींचे खासदार निवडून आलेले आहेत.

संतोष कानडे

Maratha Reservation : लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी हाती आले. महाराष्ट्रात एनडीएला १७ तर इंडिया आघाडीला ३० जागांवर यश मिळालं आहे. यामध्ये भाजपला मोठं अपयश आल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून राजीनामा देण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी त्यांनी राज्यात अनेक फॅक्टर चालल्यामुळे पराभव झाल्याचं मान्य करुन मराठा आरक्षणामुळे पराभव झाल्याची एक प्रकारे कबुली दिली.

राज्यात भाजपला ९ जागांवर यश मिळालं, तर शिवसेनेला ७ आणि राष्ट्रवादीला केवळ एका जागेवर यश मिळालं. तर दुसरीकडे काँग्रेसने १३, उद्धव ठाकरे गटाने ९ तर शरद पवार गटाने ८ जागांवर यश मिळवलं आहे. सांगलीची एक अपक्ष जागा निवडून आलेली आहे.

राज्यामध्ये कुठल्या समाजाचे किती खासदार निवडून आले, याची आकडेवारी बघितली असता ४८ पैकी २६ जागांवर मराठा उमेदवार विजयी झालेले आहेत. तर ९ ओबीसी खासदार, ६ अनुसूचित जातींचे खासदार आणि ४ अनुसूचित जमातींचे खासदार निवडून आलेले आहेत. विशेष म्हणजे नितीन गडकरी ब्राह्मण, पियूष गोएल अग्रवाल आणि अनिल देसाई सारस्वत ब्राह्मण, असे खासदार निवडून आलेले आहेत.

मराठा समाजाचे खासदार

उदयनराजे भोसले, शाहू छत्रपती, डॉ. शोभा बच्छाव, नारायण राणे, श्रीकांत शिंदे, स्मिता वाघ, नरेश म्हस्के, विशाल पाटील सुप्रिया सुळे, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे, धैर्यशील मोहिते, अरविंद सावंत, धैर्यशील माने, संजय देशमुख, प्रतापराव जाधव, राजाभाऊ वाजे, निलेश लंके, ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संदीपान भुमरे, वसंत चव्हाण, नागेश आष्टीकर, संजय जाधव, बजरंग सोनवणे, अनुप धोत्रे, डॉ. कल्याण काळे

ओबीसी खासदार

डॉ. अमोल कोल्हे, प्रतिभा धानोरकर, सुनील तटकरे, रवींद्र वायकर, रक्षा खडसे, डॉ. प्रशांत पडोळे, संजय दिना पाटील, सुरेश म्हात्रे, अमर काळे.

अनुसूचित जमातींचे खासदार

डॉ. हेमंत सावरा, भास्कर भगरे, गोवाल पाडवी, डॉ. नामदेव किरसान

अनुसूचित जातींचे खासदार

डॉ. शिवाजी काळगे, भाऊसाहेब वाकचौरे, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railway : नवरात्रोत्सवापासून ते दिवाळीपर्यंत... 'या' राज्यात धावणार विशेष गाड्या; 6,000 गाड्यांचं नियोजन, पाहा रेल्वेचं वेळापत्रक

Nitin Gadkari : RSS-BJP मध्ये मतभेद? राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड का लांबतेय? नितीन गडकरी म्हणाले, 'तुम्ही चुकीच्या व्यक्तीला...'

Solapur News: 'मोहोळ तालुक्याला चार नद्यांच्या पुराचा वेढा'; सीनेने अनेक ठिकाणी पात्र बदलले; भीमा, भोगावती, नागझरीलाही पूर

Plastic Use and Brain Health Alert: दररोजच्या प्लास्टिकमुळे वाढतायत मेंदूविकार; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा

Women Health: पाळी, गरोदरपणा आणि रजोनिवृत्तीचा स्त्रियांच्या आतड्यांवर परिणाम; वाचा डॉ. राकेश पटेल यांचे सविस्तर मार्गदर्शन

SCROLL FOR NEXT