Maval Election Results esakal
लोकसभा २०२४

Maval Constituency Lok Sabha Election Result : मावळमधून संजोग वाघेरे पराभूत, श्रीरंग बारणेंची हॅट्रिक

Maval lok sabha election result 2024 shivsena eknath shinde shrirang barne shivsena uddhav tackeray sanjog waghere : मावळ लोकसभा मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथील राजकीय चित्र बदलले आहे.

संतोष कानडे

Maval Constituency: मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी मावळ मतदारसंघामध्ये साधारण ५४ टक्के मतदान झाले होते. तब्बल दोन टर्म खासदार राहिलेले श्रीरंग बारणे हे शिवसेनेचे म्हणजेच महायुतीचे उमेदवार होते. तर ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे हे रिंगणात होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणेंनी हॅट्रिक साधत विजय मिळवला आहे. बारणे यांना ९६ हजार ६१५ मतांचं मताधिक्य असून ६ लाख ९२ हजार ८३२ मतं बारणेंना पडले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मतं पडली आहेत. त्याखालोखाल वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांना २७ हजार ७६८ मतं पडली आहेत.

2024- मावळ मतदारसंघात कुणाला किती मतं पडली?

  • श्रीरंग बारणे- ६,९२,८३२ (शिवसेना)

  • संजोग वाघेरे- ५,९६,२१७ (उबाठा)

  • माधवी जोशी- २७,७६८ (वंचित)

  • विजयी उमेदवाराचे मताधिक्य- ९६,६१५

मतदारसंघाची राजकीय परिस्थिती काय?

या मतदारसंघात पुणे जिल्ह्यातील पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत आणि पनवेल असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर येथील राजकीय चित्र बदलले आहे. आता या मतदारसंघात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन, शिवसेनेचे एक व भाजपला पाठिंबा दिलेले अपक्ष एक असे आमदारांचे संख्याबळ आहे.

२०१९चे चित्र

श्रीरंग बारणे(शिवसेना) विजयी मते : ७२०६६३

पार्थ पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) मते : ५०४७५०

राजाराम पाटील (वंचित बहुजन आघाडी) मते : ७५९०४

कांदे किसन (बहुजन समाज पक्ष) मते : १०१९७

विजयी उमेदवाराचे मताधिक्य : २१५९१३

'हे' मुद्दे प्रभावी ठरले

  • पुणे ते लोणावळा रेल्वेचे रखडलेले चौपदरीकरण

  • पवना धरणग्रस्तांचा गेली ५० वर्षे रखडलेला परतावा व पुनर्वसन

  • मावळ, कर्जत सारख्या तालुक्यांत दूरसंचारचे जाळे अनेक भागांत नाही

  • रेडझोनची टांगती तलवार

वर्चस्व

  • २००९ : शिवसेना

  • २०१४ : शिवसेना

  • २०१९ : शिवसेना

कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान?

नागपूर- ५४.३२ टक्के, नांदेड- ६०. ९४ टक्के, नंदुरबार- ७०.६८ टक्के, नाशिक- ६०.७५ टक्के, पालघर- ६३.९१ टक्के, परभणी- ६२.२६ टक्के, पुणे- ५३.५४ टक्के, रामटेक- ६१.०१ टक्के, रावेर- ६४.२८ टक्के, सांगली- ५५.१२ टक्के, सातारा- ५७.३८ टक्के, शिर्डी- ६३.०३ टक्के, शिरूर- ५४.१६ टक्के, सोलापूर- ५३.९१ टक्के, ठाणे- ५२.०९ टक्के, वर्धा- ६४.८५ टक्के, यवतमाळ- वाशीम-६२.८७ टक्के, बारामती- ५३.०८ टक्के, कोल्हापूर- ५६.१८ टक्के, लातूर- ६३.३२ टक्के, मळा- ५४.७२ टक्के, मावळ-५४.८७ टक्के, उस्मानाबाद- ६२.४५ टक्के, रायगड- ५६.७२ टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग- ५५.६८ टक्के आणि सांगली- ६२.८४ टक्के, अहमदनगर- ६६.६१ टक्के, अकोला- ६१.७९ टक्के, अमरावती- ६३.३७ टक्के, औरंगाबाद- ६३.०३ टक्के, भंडारा गोंदिया- ६७.०४ टक्के, बीड- ७०. ९२ टक्के, भिवंडी- ५९.८९ टक्के, बुलढाणा- ६२.०३ टक्के, चंद्रपूर- ६७.५५ टक्के, धुळे – ६०.२१ टक्के,गडचिरोली-चिमूर- ७१.८८ टक्के, हिंगोली – ६३.५४ टक्के, जळगाव- ५८.४७ टक्के, जालना- ६९.१८ टक्के, कल्याण- ५०.१२ टक्के, मुंबई उत्तर- ५७. ०२ टक्के, मुंबई उत्तर मध्य- ५१. ९८ टक्के, मुंबई ईशान्य- ५६.३७ टक्के, मुंबई उत्तर पश्चिम- ५४.८४ टक्के, मुंबई दक्षिण- ५०.०६ टक्के, मुंबई दक्षिण मध्य- ५३.६० टक्के.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elon Musk’s Tesla: टेस्लाची गाडी आता मुंबईत धावणार; BKC मध्ये पहिलं शोरूम उघडणार, किती आहे किंमत?

Pune: गॅस खरेदी करताय? सावधान! 2 ते 3 किलो गॅसची होतेय चोरी; तरुणांच्या सतर्कतेमुळे काळाबाजार उघड, पुण्यात काय घडलं?

Medical College: मुख्यमंत्र्यांचे आश्वासन! 'अहिल्यानगर शहरातच वैद्यकीय महाविद्यालय होणार'; आमदार जगतापांनी घेतली भेट

Tata Group: शेअर बाजार उघडताच TCSचे शेअर्स कोसळले; गुंतवणूक करावी की नाही, तज्ज्ञ काय म्हणतात?

Homemade Glow Mask: 'या' 4 प्रकारे चेहऱ्यावर मुलतानी माती लावा अन् 15 मिनिटांत चेहऱ्यावर येईल अद्भुत चमक

SCROLL FOR NEXT