Nana Patole sakal
लोकसभा २०२४

Nana Patole : लोकशाहीसाठी लढाई जिंकलीच पाहिजे : पटोले

‘‘ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला, त्या लोकांना जनतेकडे मते मागण्याचा अधिकार नाही. अशा शक्तींना या निवडणुकीत पराभूत करायचे आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कंबर कसून काम करावे’’

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘ज्यांनी महापुरुषांचा अपमान केला, त्या लोकांना जनतेकडे मते मागण्याचा अधिकार नाही. अशा शक्तींना या निवडणुकीत पराभूत करायचे आहे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने कंबर कसून काम करावे’’, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.

पुणे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ कोथरूड विधानसभा मतदारसंघात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी हे आवाहन केले. पटोले म्हणाले, ‘‘महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा महत्त्वाच्या प्रश्नांमुळे जनता त्रस्त झाली आहे. मोदी सरकार मात्र कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेले आहे.’’

खोट्या आश्वासनांना व्यापारी वैतागले

जीएसटीमध्ये वारंवार बदल केले जात आहेत. व्यापाऱ्यांची छळवणूक होत आहे. भाजपच्या खोट्या आश्वासनांनी व्यापारी वैतागले आहेत. आम्ही सत्तेत आल्यावर व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सूट देऊ. तसेच जाचक कायद्यात बदल करून व्यापाऱ्यांची होणारी छळवणूक थांबवू, असे आश्‍वासन पटोले यांनी धंगेकर यांच्या प्रचारार्थ मार्केट यार्ड येथे आयोजित व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

Mumbai News: आझाद मैदानाशेजारील दुकानं बंद होणार, स्टॉलधारकांवर पालिकेचा कारवाईचा बडगा

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT