navneet rana and ravi rana sakal
लोकसभा २०२४

Navneet Rana: हनुमान चालिसा प्रकरण; राणा दाम्पत्याला कोर्टात हजर राहण्याचे निर्देश

9 मे रोजी मुंबई सत्र न्यायालयात या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसा पठन करण्याचा अट्टहास करणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आज न्यायालयात सुनावणीवेळी अनुपस्थित राहिल्यानं राणा दाम्पत्याला ९ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. (Navneet Rana Hanuman Chalisa case Rana couple directed to appear in mumbai court)

अमरावतीतील भाजपच्या उमेदवार नवनीत राणा व त्यांचे पती बडनेराचे आमदार रवी राणा यांनी एप्रिल २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी हनुमान चालीसा पठणचा प्रयत्न करून मोठा गोंधळ निर्माण केला होता. यातून त्यांनी सामाजिक वातावरण कलुषित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. (Latest Marathi News)

या प्रकरणी दोघांनी दोषमुक्ततेसाठी कोर्टात अर्ज केला होता मात्र, सत्र न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर आता आरोप निश्चितीसाठी सत्र न्यायालयात सुनावणी सुरू असून आज न्या. राहुल रोकडे यांच्या समोर या प्रकरणी सुनावणी पार पडली. (Marathi Tajya Batmya)

अमरावतीत आज (ता.२६) मतदान असल्यानं राणा दाम्पत्यानं न्यायालयात हजेरीपासून सूट द्यावी असा अर्ज अॅड. शब्बीर शोरा यांच्यामार्फत केला होता. मतदानाचं कारण विचारात घेत न्यायालयानं दाम्पत्याला एक दिवस गैरहजर राहण्याची मुभा दिली. पण आता ९ मेच्या सुनावणीला हजर राहण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

भेटीसाठी आता अपॉइंटमेंट घ्यावी लागते, स्वतःची ओळख सांगावी लागते... अजित पवारांच्या आठवणीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची खंत

Pune Bengaluru Highway : कराड उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात! कोल्हापूर-पुणे मार्गावर उद्यापासून वाहनांची चाचणी; कधी होणार पूर्ण खुला?

Ketan Agarwal Killed Case : गुगलवर शोधले खून करण्याचे पर्याय;गडावरून ढकलण्याचा केला होता सराव

Women T20 World Cup: महिला टी-२० विश्वचषक २०२८ साठी ९ संघ पात्र! पाकिस्तानलाही मिळाले तिकीट; आता उरले फक्त 'इतके' स्पॉट्स

SCROLL FOR NEXT