लोकसभा २०२४

Nitish Kumar Video : ''इकडून तिकडे उड्या मारणाऱ्याला काहीच लाभ होत नाही'', NDAच्या बैठकीत नितीश कुमार नेमकं काय म्हणाले?

नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू..जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.

संतोष कानडे

NDA Meeting Delhi : दिल्लीमध्ये आयोजित एनडीएच्या बैठकीमध्ये संससदीय समितीच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली आहे. उपस्थित सर्व सदस्यांनी मोदींच्या नावाला अनुमोदन दिलं. भाजपचे ज्येष्ठ नेते राजनाथ सिंह यांनी संसदीय दलाच्या नेतेपदासाठी मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.

प्रस्तावाच्या समर्थनात अनेक नेत्यांनी भाषणं केली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी खास त्यांच्या शैलीत खुमासदार भाषण केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिल्यानंतर नितीश कुमार यांनी इकडून तिकडे जाणाऱ्यांचा काहीही फायदा होत नाही, असं विधान केलं आहे.

नितीश कुमार म्हणाले की, मोदी दहा वर्षांपासून पंतप्रधान आहेत. या निवडणुकीत ज्या काही जागा जिंकायच्या राहिल्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीत पूर्ण होतील. आम्ही पूर्णपणे मोदींच्या पाठिशी राहू..जे काही इकडे-तिकडे लोक निवडून आले आहेत, ते पुढच्या निवडणुकीत पडतील.

इंडिया अलायन्सला उद्देशून बोलताना नितीश कुमार म्हणाले की, त्यांनी आजपर्यंत काहीही काम केलेलं नाही. परंतु तुम्ही (नरेंद्र मोदी) देशाची खूप सेवा केली आहे. विरोधकांना संधी मिळाली आहे परंतु इथून पुढे त्यांनी कुठलीच संधी मिळणार नाही.. आता मोदींच्या नेतृत्वामध्ये देश पुढे जाणार आहे.

''खरं तर आजच शपथविधी व्हायला पाहिजे होता.. लवकरात लवकर सगळं व्हावं. जे लोक इकडे-तिकडे करतात त्यांना काहीच लाभ होत नाही. आता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पूर्णपणो आहोत'' असं म्हणत नितीश कुमार यांनी नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Airstrike Afghanistan : अफगाणिस्तानच्या कुनारमध्ये पाकिस्तानचा पहाटे एअर स्ट्राईक, अनेक नागरिक जखमी झाल्याची भीती

Ambad Fire: अंबडमध्ये पहाटे चार दुकानांना भीषण आग; साहित्य जळून खाक, ५० ते ६० लाखांचे नुकसान

Pune Solapur Railways: प्रवाशांसाठी मोठी बातमी! पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास गतिमान; मांजरीपासून दोन नवीन मार्गिकांचे नियोजन, भूसंपादनाला सुरुवात

Marathi News Live Updates : 'गोकुळ'साठी आज भाजपचे शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी उद्या शेवटचा दिवस

Asian Games: भारतीय खेळाडूंचे दणादण गोल! हॉकीमध्ये पहिल्या सामन्यात पुरुष व महिला संघांची धडाकेबाज विजयी सलामी

SCROLL FOR NEXT