लोकसभा २०२४

Pankaja Munde : ''पंकजा मुंडेंनी बीड सांभाळावं'' छगन भुजबळांचा पंकजांना सल्ला; म्हणाले...

''पंकजा मुंडेंनी अगोदर बीड सांभाळावं. बीडमध्ये १३ तारखेला निवडणुका आहेत. त्यांनी तिकडे लक्ष देवून निवडून येणं महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत, असं नाहीये. उमेदवार खूप आहेत हीच अडचण आहे.''

संतोष कानडे

मुंबईः नाशिकच्या जागेसंदर्भात महायुतीकडून निर्णय होत नसल्याने उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यातच पंकजा मुंडेंनी नाशिकमधून प्रितम मुंडेंना तिकीट देईन, असं विधान केलं होतं. पंकजा मुंडेंना आता छगन भुजबळांनी सल्ला दिला असून त्यांनी अगोदर बीड सांभाळावं, असं ते म्हणाले आहेत.

बीडच्या सभेत बोलताना गुरुवारी पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या की, मी प्रितम मुंडेंना विस्थापित करणार नाही हा माझा शब्द होता. मुळात हे तिकीट मला नकोच होतं. मी ते मला नका देऊ म्हणत होतं. परंतु आता मी निवडणुकीच्या मैदानात आहे. प्रतिम ताईंना मी विस्थापित करणार नाही.. ताईंचं काहीच अडलेलं नाही, मी ताईंना नाशिकमधून उभं करेन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या.

पंकजा मुंडेंच्या या विधानावर भुजबळांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. छगन भुजबळ म्हणाले की, पंकजा मुंडेंनी अगोदर बीड सांभाळावं. बीडमध्ये १३ तारखेला निवडणुका आहेत. त्यांनी तिकडे लक्ष देवून निवडून येणं महत्त्वाचं आहे. नाशिकमध्ये उमेदवार नाहीत, असं नाहीये. उमेदवार खूप आहेत हीच अडचण आहे.

पंकजा मुंडेंनी सगळ्यांना बरोबर घेऊन निवडून यावं. माझ्या तिकीटाचा निर्णय हा मराठा समाज नाराज होता म्हणून नाहीये. उलट मराठा समाज माझ्याबरोबर होता. अनेकांनी मला समर्थन देऊन निवडणुकीत मदत करणार असल्याचं सांगितलं होतं. होतं नाशिकचा निर्णय हा महायुती घेईन, असं भुजबळ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT