Sangli Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha : संजय पाटील, विशाल पाटील यांच्यातच रस्सीखेच; विलासराव ठरणार 'किंगमेकर'?

सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी जत तालुक्याचे निर्णायक मतदान मानले जाते.

बादल सर्जे

खासदार संजय पाटील व विशाल पाटील यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत जत तालुका कोणाच्या बाजूने झुकते माप देणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

जत : सांगली लोकसभा (Sangli Lok Sabha) निवडणुकीसाठी जत तालुक्याचे निर्णायक मतदान मानले जाते. सुरवातीला तिरंगी लढतीचे चित्र असणारी ही निवडणूक. जत तालुक्यात मात्र दुरंगी लढतीत महायुतीचे संजय पाटील (Sanjay Patil), अपक्ष उमेदवार विशाल पाटील (Vishal Patil) यांच्यात खरी रस्सीखेच दिसून आली.

लोकसभा निवडणूक ही आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मैदान तयार ठेवण्याच्या दृष्टीने नव्याने आमदारकीसाठी इच्छुक असलेल्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवाय, भाजपला रामराम ठोकून अपक्ष उमेदवार विशाल यांना पाठिंबा देणारे विलासराव हे यंदा ‘किंगमेकर’ची भूमिका पार पडणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

माजी आमदार विलासराव जगताप, खासदार संजय पाटील यांच्यात पडलेली वादाची ठिणगी व यातून जगताप यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करून तडकाफडकी दिलेला राजीनामा ही भाजप अंतर्गत जतमधून पडलेली पहिली ठिणगी होती. यातून पुन्हा एकदा विलासराव जगताप यांनी दुष्काळी फोरमच्या माध्यमातून निवडणुकीत बंड पुकारले. याला कवठेमहांकाळच्या अजितराव घोरपडे यांची साथ मिळाली. दुसरीकडे, काँग्रेसच्या हक्काच्या बालेकिल्ल्यावर शिवसेनेने केलेला दावा यातून विशाल पाटील यांनी बंडाचा झेंडा स्वीकारल्याने त्यांना जत व कवठेमहांकाळमधून मोठी ताकद मिळाली.

दरम्यान, खासदार संजय पाटील यांनी म्हैसाळ विस्तारित योजनेला दिलेल्या बळाच्या जोरावर आणि दुसऱ्या फळीतील प्रकाश जमदाडे, डॉ. रवींद्र आरळी, तम्मनगौडा रविपाटील या नेत्यांना सोबत घेऊन जत तालुक्यात लोकसभेला सामोरे जाण्याचे धारिष्ट्य दाखविले. मात्र, जिल्ह्यात शिजलेल्या राजकारणाची झळ जत तालुक्यापर्यंतही पोहोचली. यामध्ये नेते एका व्यासपीठावर, तर सर्वसामान्य कार्यकर्ते एका बाजूला, अशी परिस्थिती निर्माण झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी ही निवडणूक भावनिकतेच्या जोरावर लढविली. यात त्यांनी जत तालुक्यातील जनतेमध्ये आपला विश्वास निर्माण करण्यात काहीसे यश मिळाले.

मात्र, खासदार संजय पाटील यांनी यंदाचा हा दुष्काळ जतच्या वाट्याचा शेवटचा असेल, असा ठोस आत्मविश्वास बाळगत दुष्काळी जनतेच्या भावनांशी संवाद साधला. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा करिष्मा या निवडणुकीत नवखा होता. त्यांचा जतच्या जनतेवर किती परिणाम झाला? या सगळ्याचा सोक्षमोक्ष येणाऱ्या ४ जून रोजी मतपेट्यामधून स्पष्ट होणार असून खासदार संजय पाटील व विशाल पाटील यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढतीत जत तालुका कोणाच्या बाजूने झुकते माप देणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: द. आफ्रिकेच्या मारिझान कापने झुलन गोस्वामीचा विश्वविक्रम मोडला! सेमीफायनलमध्ये ५ विकेट्स घेत घडवला इतिहास

एसटी बसमधून एमडी ड्रग्ज घेऊन येणारा मोहम्मद अझहर कुरेशी सोलापुरात जेरबंद! सापळा रचून बस स्थानकावर पकडले; पुरवठादारास व्हॉट्‌सॲप कॉलवरून करायचा संपर्क

Nilesh Ghaywal : गुंड घायवळ लंडनमध्ये; यूके हायकमिशनची माहिती, प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेला गती

Kalyan Crime: दोन वर्षांच्या चिमुकलीवर कल्याण पोलिसांनी दाखल केला गुन्हा; खुनाचा प्रयत्न केल्याचा ठपका

Women's World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच मिळवलं फायनलचं तिकीट! इंग्लंडचा सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT