Sangli Loksabha Election Mahayuti
Sangli Loksabha Election Mahayuti esakal
लोकसभा २०२४

Sangli Loksabha : महायुतीमळे बालेकिल्ला मजबूत, मात्र अंतर्गत गटांचा संघर्ष टोकाचा; मतदारांची भूमिका ठरणार महत्त्वाची

नागेश गायकवाड

गत पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. पडळकर स्वगृही भाजपात आलेत, तर संजय पाटील यांचा बाबर गटाशी असलेला दोस्ताना तुटला आहे.

आटपाडी : महायुतीचा (Mahayuti) मजबूत बालेकिल्ला असलेल्या आटपाडी तालुक्यातून महायुतीचे शिवसेना शिंदे गट भाजप आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचे राष्ट्रवादीचे (NCP) शिलेदार भक्कमपणे भाजप उमेदवार संजय पाटील यांच्या मागे उभे राहिलेले दिसेल. त्यात गत वेळी तालुक्यात पहिल्या क्रमांकाची मते घेतलेले आमदार गोपीचंद पडळकर भाजपमध्ये असल्याने वरकरणी तरी खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांची बाजू मजबूत होईल.

मात्र बाबर गटाशी संघर्ष, दुष्काळ फोरम गटाचे नेते माजी आमदार राजेंद्र देशमुख आणि कधीकाळी संजय पाटील यांच्याशी टोकाचा संघर्ष केलेले गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या भूमिकेसमवेत फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते आणि मतदारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. महायुतीमुळे आटपाडीचा बालेकिल्ला मजबूत दिसत असला, तरी त्यांच्या समोर अदृश्य तगडे आव्हान असणार आहे.

खासदार संजय पाटील यांना गतवेळी आटपाडी तालुक्यातून क्रमांक दोनची मते मिळाली होती. सध्या भाजपात असलेले आमदार गोपीचंद पडळकर यांनी २०१९ मध्ये ‘वंचित’मधून लोकसभा लढवून तालुक्यातून विक्रमी पहिल्या क्रमांकाची मते घेतली. त्या आधी त्यांचा खासदार संजय पाटील यांच्याशी टोकाचा संघर्ष होता. दोघांच्याही कार्यकर्त्यांत सतत वादावादी होती. त्या आधी २०१४ मध्ये प्रतीक पाटील (Pratik Patil) लोकसभेचे उमेदवार होते. त्या वेळी त्यांच्यासमवेत बाबर आणि देशमुख दोन्ही गट होते. भाजपमधून मैदानात उतरलेले संजय पाटील यांच्यासमवेत गोपीचंद पडळकर आणि जयंत पाटील यांचे कार्यकर्ते होते.

मोदी लाटेत प्रतीक पाटील यांच्यासमवेत नेते असूनही पराभव झाला. २०१९ मध्ये संजय पाटील यांच्यासमवेत बाबर, देशमुख गट होता. मात्र पडळकर यांची उमेदवारी असल्याने मतदारांचा कौल त्यांना राहिला. दरम्यान, गत पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहिले आहे. पडळकर स्वगृही भाजपात आलेत, तर संजय पाटील यांचा बाबर गटाशी असलेला दोस्ताना तुटला आहे. त्यातच दुष्काळी फोरमचे नेते विलासराव जगताप यांनी घेतलेल्या भूमिकेसमवेत आटपाडीतील दुष्काळी फोरमचे नेते जाणार का? आणि बाबर गट युतीधर्म पाळणार का, याकडे लक्ष असणार आहे.

तालुक्यात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे गट आणि कार्यकर्ते आहेत. ते काँग्रेससमवेतच राहतील, असे चित्र दिसते. महायुतीतील तिन्ही पक्षांच्या गटातील नेते एकत्र आले तरी त्यांचे कार्यकर्ते आणि मतदारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. मराठा आरक्षणावरून समाजातील युवकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे. आटपाडीतून दहा युवकांनी लोकसभेची उमेदवारी करण्याची तयारी चालवली आहे. ‘वंचित’चा हक्काचा मतदार दलित आणि मागासवर्गीय समाज यावेळी ‘वंचित’समवेत कितपत राहील, तेही ठरणार आहे.

कार्यकर्ते, मतदारांची भूमिका निर्णायक

मतदार सुज्ञ झाला आहे. युवा मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नेत्यांच्या भूमिकेसमवेत मतदार कितपत जाईल, याबाबत शंका आहे. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते आणि जागृत मतदारांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. नेतेमंडळी प्रचार सभेत दिसतील, मात्र त्यांच्यासमवेत किती कार्यकर्ते येतील, तेही महत्त्वाचे असणार आहेत. फिल्डवर काम करणारे कार्यकर्ते प्रत्यक्षात कोण आणि कुणाचे काम करणार, ते लवकरच पाहायला मिळेल.

बलाबल

  • जिल्हा परिषद भाजप ४

  • पंचायत समिती भाजप ६ काँग्रेस १ राष्ट्रवादी १

  • (शरद पवार)

  • बाजार समिती भाजप ९ शिवसेना ९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

MS Dhoni Retirement : "एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले..." थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT