Shiv Sena Candidate Chandrahar Patil esakal
लोकसभा २०२४

Sangli Lok Sabha Result : चंद्रहार पाटलांचा 'अभिमन्यू'च; राजकारणात अनामत जप्त होणं मानहानीकारकच!

ज्यांनी बोट धरले होते, त्यांनीही अर्ध्यात बोट सोडले. राजकारणात अनामत (Deposit) जप्त होणे हे मानहानीकारक असते.

सकाळ डिजिटल टीम

२२ ला उद्धव ठाकरे मिरजेत आले. हात उंचावत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. ना महाविकास आघाडीचा विचार घेतला, ना चर्चा केली. तिथेच गणित फसले.

सांगली : डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील (Chandrahar Patil)... जिल्ह्याच्या राजकीय पटलावर मोठ्या डावात अचानक उमटलेला तारा... योद्ध्याच्या थाटात ते मैदानात आले... अज्ञात बोट धरून त्यांनी लोकसभेच्या चक्रव्यूहात प्रवेश केला, मात्र चक्रव्यूह कसा भेदायचा, हे त्यांना अखेरपर्यंत कळाले नाही.

ज्यांनी बोट धरले होते, त्यांनीही अर्ध्यात बोट सोडले. राजकारणात अनामत (Deposit) जप्त होणे हे मानहानीकारक असते. कुस्तीत पहिल्याच मिनिटाला पाठ टेकावी तसे, पहिल्या मोठ्या निवडणुकीत त्यांना ते सहन करावे लागले, मात्र महाराष्ट्रव्यापी प्रसिद्धी, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याशी संबंध आणि संयम ठेवण्याची भूमिका यामुळे एक नवा राजकीय चेहरा जिल्ह्याला नक्कीच मिळाला. ते राजकारणात भवितव्य शोधू शकतात, इतके नाव त्यांनी नक्कीच कमावले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) या पक्षाकडून मशाल चिन्हावर लढणारे चंद्रहार पाटील यांना ५९ हजार ७९२ मते मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली. लोकसभा लढवायची, हे दोन वर्षांपासून त्यांनी ठरवले होते. राजकारणातील गुरू आमदार जयंत पाटील याच्याकडे त्यासाठी प्रयत्न केले होते. आधी त्यांनी वंचित बहुजन आघाडीशी चर्चा केली. त्यांची उमेदवारी जाहीर झाली. सूत्रे फिरली, चंद्रहार पाटलांसाठी अचानक उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्रीं’चे दरवाजे उघडले. चंद्रहार पाटील यांच्यासाठी तो सुखद धक्का होता. मात्र, राजकारणातील तो चक्रव्यूह असल्याची जाणीव व्हायला त्यांना वेळ लागला. ते शिवसैनिक झाले. ११ मार्चला शिवसेनेत प्रवेश केला.

२२ ला उद्धव ठाकरे मिरजेत आले. हात उंचावत चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली. ना महाविकास आघाडीचा विचार घेतला, ना चर्चा केली. तिथेच गणित फसले. चंद्रहार पाटील एकाकी पडत गेले. चंद्रहार पाटील यांची उमेदवारी म्हणजे जयंत पाटील यांचे षड्‌यंत्र आहे, असा आरोप सुरू झाला. जयंतरावांनी तो अमान्य केला, मात्र चंद्रहार यांच्या पाठीशी ताकद उभी करताना त्यांची अडचण झाली. ‘आत एक अन् बाहेर एक असे मला चालणार नाही’, असे त्यांनी खडसावले, पण प्रत्यक्षात ‘तुतारी’धारी मंडळींनी काय केले, हा संशोधनाचा विषय ठरेल. चंद्रहार पाटील यांना पडलेली मते पाहता, जयंत पाटील यांचा पासंग एवढाच उरलाय का, असा प्रश्‍न पडतो.

नाउमेद न होणारा मल्ल

चंद्रहार पाटील हे ताकदीचे पैलवान आहेत. दोनवेळा महाराष्ट्र केसरी गदा पटकावली. लोकसभा निवडणूक त्यांच्यासाठी नवीन होती. इथले डाव त्यांना लक्षात आले नाहीत. मात्र, एका पराभवाने मल्ल संपत नाही, याची जाणीव त्यांना नक्की आहे. राजकारणात ते पुन्हा उभारी घेतील, असा विश्‍वास त्यांच्या समर्थकांना वाटतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT