Star Campaigners Of Congress For Lok Sabha 2024
Star Campaigners Of Congress For Lok Sabha 2024 Esakal
लोकसभा २०२४

Congress: काँग्रेसच्या स्टार प्रचारकांचा विदर्भात झंझावात

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या सभा होणार असून, त्यात पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, नेते राहुल गांधी व सरचिटणीस प्रियांका गांधी यांचा समावेश आहे. या नेत्यांच्या कन्हान, साकोली व चंद्रपूर येथे या सभा होणार आहेत.

पहिल्या टप्प्यात विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या लोकसभा मतदारसंघांमध्ये येत्या १९ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी साकोली (भंडारा), कन्हान (रामटेक) व चंद्रपूर येथे या जाहीरसभांचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या १३ एप्रिलला राहुल यांची जाहीर सभा भंडारा जिल्ह्यातील साकोली येथे डॉ. प्रशांत पडोळे यांच्या प्रचारासाठी होणार आहे. येत्या १४ एप्रिलला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नागपूरमध्ये आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ते दीक्षाभूमीला भेट देऊन अभिवादन करतील. त्यानंतर नागपूरला लागून असलेल्या कन्हान या गावात त्यांची सभा होणार आहे.

कन्हान परिसर रामटेक मतदारसंघात येतो. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघांच्या सीमेवर असलेल्या गावाची या प्रचारसभेसाठी निवड करण्यात आली आहे. रामटेकमध्ये श्याम बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार आहेत.

प्रियांका गांधी यांच्या सभेसाठी मैदान निश्‍चित नाही

चंद्रपूरमध्ये येत्या १६ एप्रिलला सरचिटणीस प्रियांका गांधी यांची प्रचारसभा होणार असल्याचे समजते. परंतु अद्यापही त्यांच्या सभेसाठी मैदान मिळू शकलेले नाही. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी प्रियांका या चंद्रपुरात येत आहेत.

ज्या मैदानासाठी काँग्रेसने अर्ज केला आहे. ते मैदान अचानकपणे एका अपक्ष उमेदवाराने प्रचार सभेसाठी राखीव ठेवल्याने प्रियांका यांच्या सभेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र याच मैदानावर सभा घेण्यासाठी आग्रही आहेत. याआधी पंतप्रधान मोदी यांची चंद्रपूरमध्ये सोमवारी जाहीर सभा झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT