Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha esakal
लोकसभा २०२४

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : नारायण राणेंना महायुतीची उमेदवारी म्हणजे मला देवच पावला; असं का म्हणाले राऊत?

देवाधर्माची पर्वा न करता मंदिरावर वरवंटा फिरवणाऱ्या राणेंना देव शिक्षा करणारच आणि पराभवाची हॅट्‌ट्रिक होणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

‘‘राडेबाज कृती कोकण स्वीकारणार नाही. शिव्या घालणाऱ्यांनी अनामत टिकवावी, असे आव्हान आहे.''

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघातून नारायण राणे (Narayan Rane) यांना महायुतीची उमेदवारी म्हणजे मला देवच पावला. याचा अर्थ विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर देवाची कृपा आहे. मात्र, देवाधर्माची पर्वा न करता मंदिरावर वरवंटा फिरवणाऱ्या राणेंना देव शिक्षा करणारच आणि पराभवाची हॅट्‌ट्रिक होणार, अशी प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांनी दिली.

प्रचारानिमित्त रत्नागिरी दौऱ्यावर असताना पत्रकारांशी झालेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. राऊत म्हणाले, ‘‘राडेबाज कृती कोकण स्वीकारणार नाही. शिव्या घालणाऱ्यांनी अनामत टिकवावी, असे आव्हान आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे नीलेश राणे (Nilesh Rane) यांना महत्त्व देत नाही. माझा खासदारकीचा निधी १०० टक्के खर्ची पडला आहे. त्याची माहिती घेऊन आरोप करावे. फुकटचे अकलेचे तारे तोडू नयेत.

माझा एक पैसाही टक्केवारीशी संबंध आहे, असे सिद्ध झाले तर पाहिजे ते करायला तयार आहे. नारायण राणेंनी आरोप करावेत , त्याला उत्तर देण्यास हा बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक सक्षम आहे; परंतु नको त्यांनी आरोप करू नयेत.’’

दहा वर्षांमध्ये काय केले म्हणणाऱ्या राणेंनी ३९ वर्षांमध्ये दोन्ही जिल्ह्यांत किती दिवे लावले, ते दाखवावे. नारायण राणे हे लघु व सूक्ष्म मंत्रालय विभागाचे (एमएसईमी) पहिले लाभार्थी आहेत. त्यांच्या कणकवलीतल्या ऑफिसमध्ये एमएसएमईचं कार्यालय आहे. त्याचे ते भाडं दर महिन्याला घेतात.

प्रोसेसिंग युनिट कुठे?

२० प्रोसेसिंग युनिट कुठे केली ते तरी दाखवा. दोन्ही जिल्ह्यात एमएसएमईच्या माध्यमातून १० जणांना उभे केले ते दाखवा. या खात्याकडून सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगासाठी ७५ लाखांपासून ३ कोटींपर्यंत कर्ज दिले जाते, असे खाते आहे; परंतु त्यांना ते कळलेच नाही, असा टोला राऊत यांनी लगावला

सामंतांच्या आता नाकीनऊ

उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांना आता कळून चुकले असेल. उद्धव ठाकरेंनी त्यांच्यासाठी रेड कार्पेट टाकले होते. भाजपमध्ये गेल्यावर त्यांना किती नाकीनऊ आले ते कळले असेल, असे सूचक विधान खासदार विनायक राऊत यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

INDW vs PAKW सामन्यात वाद! पाकिस्तानी फलंदाज विकेटनंतरही मैदान सोडेना, कर्णधाराचीही अंपायरसोबत चर्चा; भारताचं मात्र सेलिब्रेशन

INDW vs PAKW, Video: पाकिस्तानचा पोपट झाला! जेमिमाहला रोड्रिग्सच्या विकेटसाठी सेलीब्रेशन करत होते अन् अचानक...

Chemical factory Fire:'रासायनिक कारखान्यातील आग २४ तासांनी आटोक्यात'; ३० बंब पाणी, अग्निशामक रसायनाचा वापर

Wonderful journey: 'कालीच्या रूपात ३३०० कि.मी.वाट तुडवत येतोय तुळजापूरला'; हैदराबादच्या बाबूराव पेंटय्यांचा चार वर्षांपासून प्रवास

SCROLL FOR NEXT