Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Uday Samant
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Uday Samant esakal
लोकसभा २०२४

Uday Samant : 'अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागं घेतलं, पण भविष्यात किरण सामंत खासदार होणार'

सकाळ डिजिटल टीम

'महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये, तिढा निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनाने हा निर्णय घेतलेला आहे.'

रत्नागिरी : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आला तरी निर्णय होत नव्हता. त्यामुळे किरण भैय्या एक पाऊल मागे आले. आता मागे आलो म्हणजे राजकारण थांबवले असे नाही. भविष्यात एकना एक दिवस किरण सामंत हे खासदार होणार आणि खासदारकीवर आमचा दावा आहे, असे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ठणकावून सांगितले.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) नारायण राणे (Narayan Rane) यांची उमेदवारी जाहीर झाल्यानतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी किरण सामंत, सुदेश मयेकर आदी उपस्थित होते. उदय सामंत म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली होती. रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा ही धनुष्यबाणाला मिळावी. शिवसेनेच्यावतीने एकमेव उमेदवार किरण सामंत होते. सगळी स्ट्रॅटेजी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर ठेवलेली होती.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अमित शहा (Amit Shah) यांच्याशी आमची चर्चा झाली होती. या सर्व चर्चेनंतर एका निर्णयापर्यंत आम्ही आलो की, ज्या पद्धतीने तिकीट वाटपाबाबत चर्चा ताणली गेली आहे की, अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आला तरी उमेदवार अजून जाहीर झालेला नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये फार मोठा संभ्रम आहे. कालच्या बैठकांनंतर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांना कुठेही त्रास होऊ नये यामुळेच स्वतः किरणभैयाने एक निर्णय घेतला. किरण यांचा मानसन्मान महायुतीमध्ये केला जाईल, असे आश्वासन स्वतः अमित शहा, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

भूमिका घेतली होती

राणेंना उमेदवारी जाहीर झाली तर काम करू, अशी भूमिका आम्ही काल रात्री घेतली. याच्यानंतर आमच्या सगळ्या कुटुंबाचीदेखील चर्चा झाली. कुटुंबांनी असा निर्णय घेतला की, नारायण राणे हे ज्येष्ठ आहेत, राजकीय नेते आहेत. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत, केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे थांबण्याची भूमिका आम्ही घेतल्याचे सामंत यांनी सांगितले.

संपूर्ण जिल्हा महायुतीसोबत

फॉर्म भरताना नारायण राणे यांच्याबरोबर राहू. संपूर्ण जिल्हा महायुतीबरोबर राहील; परंतु हे सगळं करत असताना कुठेही अमित शहांचा, देवेंद्रजींचे शब्द, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या शब्द यांसह महायुतीमध्ये मिठाचा खडा पडू नये, तिढा निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या मनाने हा निर्णय घेतलेला आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.

मन किती मोठं असावे

खासदार आज नाही उद्या किरण भैय्यांना करायचं, हे निश्चित आहे. तिढा, पेच सोडवण्यासाठी किरण भैय्या आणि मी स्वतः पुढाकार घेतला आणि राजकारणामध्ये मन किती मोठं असावं लागतं, हे किरण भैय्यांनी सगळ्याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दाखवले, असे उदय सामंत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Exit Poll: सांगलीची पाटीलकी विशाल पाटलांकडे? भाजपला बसणार अँटी इनकबन्सीचा फटका

Mumbai Rain Update : मुंबईत पाऊस कधी येणार? जाणून घ्या हवामान अभ्यासकांचा अंदाज

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Lok Sabha Election Result 2024 : ‘इंडिया’ चेच सरकार येणार 'तेजस्वी यादव' यांचा विश्‍वास: एनडीए हद्दपार होणार

Lok Sabha 7th Phase Voting : देशात सातव्या टप्प्यात ५९ टक्के मतदान! पश्चिम बंगालात सर्वाधिक तर यूपीत सर्वात कमी मतदान

SCROLL FOR NEXT