Ajit Pawar_Vijay Chormare 
लोकसभा २०२४

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा नेमका पॉईंट काय होता? या प्रश्नालाही अजित पवारांनी उत्तर दिलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी सर्व आकडेवारी आणि तपशीलवार माहितीही दिली. वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी घेतलेल्या मुलाखतीत अजित पवार यांनी विविध तिरकस प्रश्नांना सडेतोड उत्तर दिली. (Why did Ajit Pawar say I have not left the NCP party need to know)

अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला की, तुम्ही भाजपसोबत गेलात आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलात. पण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा नेमका पॉईंट काय होता? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, "मी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० जून १९९९ ला स्थापन झाला त्यावेळी जो पक्ष होता, जो झेंडा होता, जे चिन्ह होतं तेच आज आम्हाला मिळालेलं आहे. आम्ही पक्षातच आहोत" (Latest Maharashtra News)

लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो

लोकशाहीत बहुमताचा आदर केला जातो. त्यामुळं ८० टक्के आमदार जवळपास ६० ते ७० टक्के जिल्ह्यांचे अध्यक्ष तसेच कितीतरी लाख प्रतिज्ञापत्र आम्ही निवडणूक आयोगाला दाखवलं पण त्यांच्याकडं (शरद पवार) किती आमदार आहेत? आणि काय हे आपण बघितलं आहे. त्यामुळं पक्षाची सूत्र आमच्याकडं आहेत. आम्ही त्याच पक्षात आहोत. (Marathi Tajya Batmya)

समोरच्यांनी वेगळा पक्ष काढला वेगळं चिन्ह घेतलंय. अर्थात आमच्या चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात प्रकरण सुरु आहे. त्यासंदर्भात त्यांनी प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचा उल्लेख करायला लावला पण चिन्ह आम्हाला वापरायला परवानगी दिली. हे आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं.

दबाव होता यात नखाइतकंही सत्य नाही?

शरद पवारांपासून वेगळं होण्यामागं केंद्रीय यंत्रणांचा दबाव होता का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "चर्चा काहीपण होत असते. त्यात नखाइतकं देखील सत्य नव्हतं. माझ्या चौकश्या मागेच झाल्या होत्या. उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना आर्थिक गुन्हे शाखेनं मला क्लीनचीट दिली होती. (Latest Marathi News)

पण पुन्हा त्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आणि पुन्हा चौकशी झाली आणि पुन्हा क्लीनचीट दिली. उगाचच एखाद्याची बदनामी करायची म्हणून करायची. आज काय आमच्या सर्वच ८० टक्के आमदारांची चौकशी चालू होती का? जेव्हा एखादा मुद्दा मिळत नाही तेव्हा हे घडतं त्यामुळं यात काही तथ्य नाही, असं यावेळी अजित पवारांनी म्हटलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheesh Mahal Delhi: दिल्लीतील 370 वर्षे जुने 'शीशमहाल' अखेर उघडले! जाणून घ्या तिकिट, वेळ आणि विशेष माहिती

आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2025

मोठी बातमी! सोलापूर जिल्हा बॅंकेचे ६ शाखाधिकारी निलंबित; बनावट सोन्यावर दिले लाखोंचे कर्ज; माळशिरस, मंगळवेढा, सांगोल्यातील शाखांमधील धक्कादायक प्रकार

Panchang 11 July 2025: आजच्या दिवशी ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

व्रत आरोग्याचे!

SCROLL FOR NEXT