Shiv Sena UBT| Congress Loksabha 2024 Esakal
Loksabha 2019

MVA: शिवसेना - काँग्रेस मध्ये उत्तर मुंबईच्या जागेवरून वादाची शक्यता

Shivsena-Congress: महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या आहेत की केवळ बदला घ्यायचा आहे, हे एकदा ठाकरे गटाने ठरवायला पाहिजे,’’ असेही म्हात्रे म्हणाल्या.

सकाळ वृत्तसेवा

शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यामधील सांगलीच्या जागेचा वाद मिटला नसतानाच उत्तर मुंबईच्या जागेवरून महाविकास आघाडीच्या या दोन घटक पक्षांमध्ये पुन्हा एकदा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे, महायुतीत शिंदे गटाकडून नाशिकमध्ये अजित पवार गटाकडून मंत्री असलेल्या छगन भुजबळ यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध आहे.

ठाकरे गटाच्या वतीने उत्तर मुंबईचे उमेदवार म्हणून विनोद घोसाळकर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे. या जागेबाबत काँग्रेसकडून प्रतिसाद येत नसल्याने ही जागा घोषित करण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतला असल्याचे समजते.

काँग्रेस पक्ष हा दक्षिण मध्य आणि सांगलीच्या जागेसाठी आग्रही असून जागा मिळवण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या दिल्लीवाऱ्या सुरु आहेत. त्यातच आता उत्तर मुंबईच्या जागेच्या वादाची भर पडण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील सांगली आणि उत्तर मुंबई या जागांवर काँग्रेसने दावा सांगितला आहे; मात्र सांगलीतून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. तर उत्तर मुंबईतून अद्याप उमेदवार घोषित झाला नसला तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी थेट प्रचारालाच सुरुवात केली आहे. घोसाळकर यांनी मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केल्यानंतर आता काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

केवळ बदला घ्यायचाय का?

काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी शिवसेनेकडून आघाडीचा धर्म पाळला जात नसल्याचा आरोप केला आहे. उत्तर मुंबईच्या जागेबाबत अद्याप चर्चा सुरू असताना अशा पद्धतीने थेट प्रचाराला सुरुवात करणे योग्य नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या आहेत की केवळ बदला घ्यायचा आहे, हे एकदा ठाकरे गटाने ठरवायला पाहिजे,’’ असेही म्हात्रे म्हणाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी भगवान विष्णूंचा दहावा अवतार कल्कीला पाहिलंय' साध्वी झालेल्या ममता कुलकर्णींचा दावा, गाईबद्दल बोलताना म्हणाल्या...

Sangli Farmer Death : उसाच्या वाड्याच्या वादातून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण; तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

Latest Marathi News Live Update : सीटीईटी परीक्षा व मतदान एकाच दिवशी; शिक्षकांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्याची मागणी

Anjali Bharti: ‘अनावधानाने शब्द निघाला…’ ; गायिका अंजली भारतींची सोशल मीडियावर माफी, प्रकरण मात्र गंभीर!

Shantilal Suratwala Passed Away : पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन, ७६ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास

SCROLL FOR NEXT