Mohan Bhagwat
Mohan Bhagwat 
Loksabha 2019

LokSabha 2019 : भाजपसाठी संघ उतरणार मैदानात; शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट! 

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार आणण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्ण जोमाने मैदानात उतरणार आहे. यंदा शंभर टक्के मतदान घडवून आणण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी गेल्या चार वर्षांपासून तयारी सुरू केली होती. 

'हिंदुस्तान टाईम्स'ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले आहे. 2014 च्या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळविल्यानंतर वर्षभरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी एक योजना तयार करून त्याचे सादरीकरण संघातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसमोर केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला देशभरात 31 टक्के मते मिळाली होती. 2019 मध्ये पुन्हा सत्तेत येण्यासाठी मतांची टक्केवारी वाढविण्याची गरज असल्याचे भाजपच्या पक्ष संघटनेने त्याचवेळी नमूद केले होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी विरोधक एकत्र येतील आणि त्यावर मात करण्यासाठी मतांची टक्केवारी वाढविण्याची गरज असल्याचे शहा यांनी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेतील त्या सादरीकरणामध्ये 2014 मध्ये सांगितले होते. गेल्या निवडणुकीत भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या. 

'मत वाया जाण्याने देशाचे नुकसानच होते. त्यामुळे सर्व संघ स्वयंसेवकांनी घराघरांत प्रचार करून मतदानाचे महत्त्व पटवून द्यावे, अशी सूचना करण्यात आली आहे', असे सूत्रांनी सांगितले. 

-------------------------------
मतदानाची टक्केवारी वाढल्याचा फायदा कुणाला होईल?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मदत घेत भाजप यंदाही बहुमत मिळवेल का?

मांडा तुमचे मत!
लिहून पाठवा webeditor@esakal.com या ई-मेलवर आणि सब्जेक्टमध्ये लिहा 'माझे विश्लेषण'
-------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT