sanjay kakade
sanjay kakade 
Loksabha 2019

Loksabha 2019 : संजय काकडेंचे बहुचर्चित बंड पडले थंड; भाजपमध्येच राहणार!

सकाळवृत्तसेवा

मुंबई : भाजपचे राज्यसभेतील खासदार व पुण्याच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते संजय काकडे यांचे मागील अनेक दिवलसांतील बंड थंड झाले आहे. पुण्यातून जो उमेदवार निश्चित होईल त्याचाच प्रचार करणार असल्याची ग्वाहीही काकडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यामुळे संजय काकडेंच्या पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

काकडेंचे मन त्यांचे व्याही व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी वळवले. तसेच मुख्यमंत्र्यांनी काकडे यांनी भविष्यातील जबाबदारीची ग्वाही दिली आहे. भाजपवरील नाराजीमुळे काकडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे त्यांनी 10 मार्चला सांगितले होते. यानंतर दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी त्यांच्या भेटी झाल्या. योग्य ती जबाबदारी लोकसभा निवडणूकीनंतर देण्याचे आश्वासन काकडे यांना मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

आज (ता. 22) मुंबईत राष्ट्रवादीच्या डॉ. भारती पवार व काँग्रेसचे प्रविण छेडा यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचवेळी संजय काकडेही भाजपमध्येच राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT