Yashwant Jadhav Diary
Yashwant Jadhav Diary Esakal
महाराष्ट्र

यशवंत जाधवांच्या डायरीत आणखी दोन नावे, पावणेदोन कोटींचा व्यवहार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आयकर विभागाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील शिवसेनेचे नेते यशवंत जाधव (Income Tax Raid on Yashwant Jadhav) यांच्या घरावर छापेमारी केली होती. यावेळी आयकर विभागाला एक डायरी सापडली होती. यामध्ये 'मातोश्री'ला पैसे दिल्याचा उल्लेख होता. पण, याशिवाय आणखी दोन नावांचा उल्लेख असल्याचं (Yashwant Jadhav) समोर आलं आहे. तसेच या व्यक्तींसोबत झालेला व्यवहार देखील या डायरीतून समोर आला आहे.

यशवंत जाधव यांच्या डायरीत मातोश्रीशिवाय केबलमॅनला १ कोटी २५ लाख रुपये दिल्याची नोंद आहे, तर दुसरं नाव ''M-ताई'' असं असून त्यापुढे ५० लाख रुपये दिल्याचा उल्लेख आहे. याबाबत सूत्रांनी माहिती दिली असून हे दोन नावं नेमकी कोणाची आहेत? कोणाच्या बँक खात्यात पैसा पाठविण्यात आला? याबाबत सखोल चौकशी आयकर विभाग करत आहे.

गेल्या महिन्यात शिवसेना नेते आणि मुंबई स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली होती. तीन ते चार दिवस ही कारवाई चालली होती. यावेळी आयकर विभागाने जाधव यांच्या घरातून काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्यामध्ये डायरीचा देखील समावेश होता. यशवंत जाधव यांनी मुंबई महापालिकेच्या कंत्राटांमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आयकर विभागाने केला आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात आली होती.

'मातोश्री'ला २ कोटी आणि ५० लाखांचं घड्याळ -

जाधव यांच्या डायरीत मातोश्रीला २ कोटी आणि ५० लाख रुपयांचं घड्याळ दिल्याची नोंद होती. ही माहिती पुढे आल्यानंतर मातोश्री नेमकी कोण? अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यानंतर जाधव यांनी स्पष्टीकरण देत या मातोश्री म्हणजे माझ्या आई आहेत आणि त्यांना दानधर्म करण्यासाठी मी हे पैसे दिले होते, असं म्हटलं होतं. यावरून जाधव यांच्यावर टीका देखील झाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT