BMC election Uddhav Thackeray Shiv sena aditya Thackeray BJP Eknath Shinde BMC election Uddhav Thackeray Shiv sena aditya Thackeray BJP Eknath Shinde
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेला आणखी एक धक्का ! मातोश्रीवरील बैठकीला तब्बल 10 खासदारांची दांडी

सकाळ डिजिटल टीम

Uddhav Thackeray Meeting Shivsena MP

मुंबई - शिवसेनेच्या 40 हून अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करून भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले. तब्बल 40 आमदार गेल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला. त्यातच शिवसेनेचे खासदार देखील एकनाथ शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आले होते. त्यातच सोमवारी मातोश्रीवर सुरू झालेल्या बैठकीला तब्बल 10 खासदारांनी दांडी मारली आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. (Shivsena MP News in Marathi)

मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांपाठोपाठ खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत अशा चर्चा सुरू आहे. त्यातच राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याकडे शिवसेनेच्या खासदारांचा कल आहे. या पार्श्वभूमीवर मातोश्रीवरील बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मात्र या बैठकीला लोकसभेच्या 10 खासदारांनी दांडी मारल्याचं समोर आलं आहे.

लोकसभचे उपस्थित खासदार

गजानन कीर्तिकर, मुंबई नॉर्थ वेस्ट 

अरविंद सावंत, मुंबई दक्षिण 

विनायक राउत, रत्नागिरी- सिंधुदुर्ग 

धैर्यशील माने, हातकणंगले 

हेमंत गोडसे, नाशिक 

राहुल शेवाले, दक्षिण मध्य मुंबई 

श्रीरंग बारणे, पिंपरी चिंचवड

प्रताप जाधव, बुलढाणा

सदशिव लोखंडे, शिर्डी 

राज्यसभा खासदार

संजय राउत, राज्यसभा 

प्रियंका चतुर्वेदी, राज्यसभा

गैरहजर खासदार

यवतमाळ-वाशिम - भावना गवळी

पालघर - राजेंद्र गावित

परभणी - हेमंत जाधव

कोल्हापूर - संजय मांडलिक

हिंगोली - हेमंत पाटील

उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर

कल्याण-डोंबिवली - श्रीकांत शिंदे

रामटेक - कृपाल तुमाने

ठाणे - राजन विचारे

दादरा-नगर हवेली - कलाबेन डेलकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Price: सोन्याच्या भावात मोठी वाढ; चांदीने गाठला नवीन उच्चांक, जाणून घ्या काय आहे भाव?

Latest Marathi News Live Updates : बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Viral Video: गोरिलाचा आशिक अंदाज... महिलेसोबत फ्लर्ट करत होता, प्रेयसी आली अन् त्यानंतर जे घडलं ते तुम्हीच पाहा...

Supreme Court: अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य समजून घ्या; समाजमाध्यमांच्या वापराबाबत ‘सर्वोच्च’सल्ला

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’ धरण ७६% भरलं; मराठवाड्याला दिलासा

SCROLL FOR NEXT