Sugarcane-Cutting-Worker
Sugarcane-Cutting-Worker 
महाराष्ट्र

ऊसतोड कामगारांना १४ टक्के दरवाढ

सकाळवृत्तसेवा

पुणे - ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरात सरासरी १४ टक्‍क्‍यांनी वाढ केली आहे. सर्व संघटनांनी या निर्णयाला मान्यता दिली. त्यामुळे ऊसतोड कामगारांनी संप मागे घेतल्याची माहिती महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात बैठक पार पडली. या वेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील यांच्यासह ऊसतोड कामगार संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीनंतर दांडेगावकर म्हणाले, ‘‘ऊसतोड कामगार, मुकादम आणि वाहतुकीच्या दरवाढीबाबत दर तीन वर्षांनी करार केला जातो. यंदाचा करार २०२०-२१ ते २०२२-२३ पर्यंत केला आहे. ऊसतोड कामगारांच्या मजुरीत सरासरी १४ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे त्यांना ३५ ते ४५ रुपये वाढवून मिळणार आहे. राज्यातील साखर कारखान्यांना या दरवाढीसाठी ३०० ते ३५० कोटी रुपये गतवर्षीच्या तुलनेत अधिक द्यावे लागणार आहेत. सर्व संघटनांनी या निर्णयाला आजच्या बैठकीत मान्यता दिली. महाराष्ट्राला मान्य होणारा हा तोडगा काढला आहे. राज्यातील गाळप हंगाम सुरू झाला आहे.’’

दरम्यान, स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची नोव्हेंबरअखेर नोंदणी करून डिसेंबरपासून महामंडळाचे कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केली.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT