Nana Patole Eknath Shinde
Nana Patole Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र

Nana Patole : मुख्यमंत्री शिंदेंसह 16 आमदार अपात्र ठरतील; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा मोठा दावा

सकाळ डिजिटल टीम

भविष्यात जर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात आमचा काँग्रेसचा उमेदवार उभा करणार आहे.

म्हसवड : सध्याच्या राज्य सरकारने मराठा (Maratha Community) व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवून झुलवत ठेवले, अशी टीका करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 16 आमदारही अपात्र ठरतील, असे मत व्यक्त केले.

श्री. पटोले यांनी येथील ज्येष्ठ काँग्रेस (Congress) कार्यकर्ते विकास गोंजारी यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माण तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, डॉ. धवलसिंह मोहिते- पाटील, दाऊद मुल्ला, नीलेश काटे आदी उपस्थित होते.

पटोले म्हणाले, की राज्यातील सरकार हे फसवणूक सरकार आहे. माण-खटाव तालुक्यांने नेहमीच काँग्रेस पक्षाची पाठराखण केली आहे. माण तालुक्यात याच महिन्यात मी दुसऱ्यांदा आलो आहे. या दुष्काळी माण तालुक्यास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भरघोस निधी दिला होता. यामुळेच माण तालुक्यातील सर्व सिंचन योजना मार्गी लागल्या आहेत.

मात्र, असं असतानाही येथील लोकप्रतिनिधी सध्या कोणत्या पक्षात आहेत, याचे सामान्य जनतेला काहीही देणे-घेणे नाही. ती कालही काँग्रेससोबत होती. आजही आहे अन् उद्याही राहतील, असा टोला श्री. पटोले यांनी आमदार जयकुमार गोरे यांचे नाव घेता मारला. यापुढे माण-खटावमधील काँग्रेस कार्यकर्त्यांना ताकद देणार असून, सर्वसामान्य कार्यकर्ता हीच कॉँग्रेसचे खरी ताकद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत माण- खटावमध्ये काँग्रेसचाच आमदार निवडून येईल, असा विश्वास आमदार पटोले यांनी व्यक्त केला.

राज्यात महाविकास आघाडीमध्ये कोणताही बेबनाव नसल्याचे स्पष्ट करून ते म्हणाले, ‘‘आमची आघाडी ही भक्कम असून, यापुढील सर्व निवडणुका आम्ही एकत्रित लढून सध्याच्या राज्य सरकारला सत्तेतून खाली खेचू. याच सरकारने २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत मराठा व धनगर समाजाला आरक्षणाचे गाजर दाखवले. मात्र, सत्ता येताच त्यांनी आरक्षणाचा प्रश्न लटकवत ठेवत या समाजाची घोर फसवणूक केली.’’

या वेळी स्नेहल जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले, ‘‘स्नेहल जगताप यांना शिवसेनेत प्रवेश देऊ नये, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगितले होते, तरीही त्यांनी त्यांना आपल्या पक्षात घेतले आहे. भविष्यात जर त्यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तर त्यांच्या विरोधात आमचा काँग्रेसचा उमेदवार उभा करणार आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणे पोलिसांनी दाखल केला रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा, काय आहे कारण?

LTTE Ban: राजीव गांधींची हत्या करणाऱ्या संघटनेवरील बंदी आणखी पाच वर्षांनी वाढवली; मोदी सरकारचा निर्णय

The Great Indian Kapil Show: "मुलींसारखे कपडे घालून लोकांच्या मांडीवर बसणे, हे घृणास्पद!"; 'द कपिल शर्मा' शोवर भडकला कॉमेडियन

PM Narendra Modi: मोदींच्या डोक्यावर शिवशाही जिरेटोप ! वाराणसीमधील उमेदवारी अर्जानंतर प्रफुल्ल पटेलांनी केला सत्कार

Marathi News Live Update: नाशिकमध्ये बस-कारचा अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT