178 leopard died during 2020 in maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

अख्ख राज्य हादरलं! बळी गेलेल्या बिबट्यांची संख्या पाहून तुम्हालाही बसेल धक्का

राजेश रामपूरकर

नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात बिबट्यांची संख्या १६९० झाल्याची सुखद बातमी दिली आहे. त्यात राखीव जंगलाच्या बाहेरील बिबट्याचा समावेश नाही. मात्र, राज्यात गेल्या वर्षात नैसर्गिक, रस्ते, रेल्वे अपघात, विहरीत पडून, शिकार, विजेच्या प्रवाहासह इतर कारणांमुळे १७८ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची बाब चिंता वाढवणारी आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ६८ बिबट्यांचे अधिक मृत्यू झालेत. 

बिबट्याचे आवडते खाद्य म्हणजे कुत्रा. त्यामुळे तो अधिकाधिक गावाजवळ त्याचा वावर असतो. त्यामुळे शेतकरी अथवा गावकऱ्यांना त्रासदायकही ठरत असतो. त्यामुळे गावकरीही विजेचा प्रवाह सोडून त्यांची शिकार करीत असल्याचे प्रकार उघड झालेले आहेत. या प्रकारामुळे राज्यात गतवर्षी एक तर यंदा तब्बल दहा बिबट्यांचा मृत्यू झाला आहे, तर रस्ते अपघातात ३४ तर कठडे नसलेल्या विहरीत पडून तब्बल २५ बिबटे यंदा, तर मागील वर्षी १० बिबट्यांचे जीव गेले आहेत. बिबट्याच्या अधिवासातून महामार्ग आणि रेल्वे मार्ग जात असल्याने हे रस्ते त्यांच्यासाठी जीवघेणे ठरू लागले आहेत. 

बिबट्याचा नैसर्गिक स्वभाव, वर्तणूक, बदलणाऱ्या परिस्थितीनुसार जुळवून घेण्याची क्षमता व मोठ्या प्रमाणातील प्रजोत्पादनामुळे बिबट्यांच्या संख्या वाढत आहेत. उसाची शेती इतर शेती उत्तम आश्रयस्थान म्हणून उपलब्ध आहेत. बिबट्यांचा मुक्त संचार सर्वत्र क्षेत्रात असल्याने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि इतर जिल्हा मार्गावरही त्याचा मृत्यूच्या घटना घडतात. या कारणामुळेच मानव- बिबट्यांचा संघर्ष वाढतो आणि बिबट्यांचे मृत्यू व मानवहानीच्या घटण्यामध्ये वाढ झालेली असे अधिकाऱ्यांचा म्हणणे आहे. २०१९ मध्ये मनुष्यहानीच्या ८ घटना घडल्या असून २०२० मध्ये २४ घटना घडल्या आहेत. त्यात सर्वाधिक १२ मनुष्यहानीच्या घटना नाशिक जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यापाठोपाठ चार औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. 

वर्ष बिबट्यांचा मृत्यू
२०१९ ११० 
२०२० १७८

गेल्या दोन दिवसांत दोन बिबट्याचे मृत्यू -

गेल्या दोन दिवसांत विदर्भात बिबट्याच्या मृतदेह सापडल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. इंदिरानगर, तिल्ली मोहगाव येथील देवचंद सोनवाने यांच्या मालकीच्या शेतातील विहिरीत बिबट्याचा मृतदेह तरंगत असल्याची माहिती एका व्यक्तीने वनविभागाला दिली. या माहितीवरून गोरेगाव येथील वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बिबट्या विहिरीतून बाहेर काढण्यात आला. यावेळी बिबट्याच्या समोरील पायाचे दोन्ही पंजे गायब असल्याचे समोर आले. कोणीतरी शिकार करून बिबट्याचा मृतदेह पाण्यात फेकला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : मी उद्या मुंबईकडे जाणार : मनोज जरांगे

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT