Mahavikas Aghadi Uday Samant  esakal
महाराष्ट्र बातम्या

Political News : महाविकास आघाडीतील 22 आमदार आमच्या संपर्कात; शिंदे गटातील मंत्र्याचा मोठा गौप्यस्फोट

महाविकास आघाडीला लवकरच मोठं भगदाड पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार आहे, असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला.

सोलापूर : महाविकास आघाडीला लवकरच मोठं भगदाड पडणार आहे. तब्बल 20 ते 22 आमदार आमच्या संपर्कात असून लवकरच ते भाजपात (BJP) येतील, असा मोठा गौप्यस्फोट उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी केला.

माढा (Madha) तालुक्यातील टेंभूर्णीत आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेच्या कार्यक्रमात सामंत बोलत होते. राजकारण्यांनी देखील कुस्तीप्रमाणं खिलाडूवृत्ती शिकावी. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या सर्व कुस्त्या शिंदे-फडणवीस जिंकणार आहे, असा विश्वासही यावेळी उदय सामंत यांनी व्यक्त केला.

बच्चू कडू यांच्या संपर्कात महाविकास आघाडीमधील 10 ते 12 आमदार तर 8 ते 10 आमदार माझ्या संपर्कात असल्यानं एकूण 20 ते 22 आमदार संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट सामंत यांनी केला. दरम्यान, टेंभुर्णीत शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांनी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं. यावेळी उदय सामंत यांच्यासह ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, शिंदे गटाचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत उपस्थित होते.

या कुस्ती स्पर्धेला पुणे, सातारा, कोल्हापूरसह सोलापूर जिल्ह्यातील नामांकित कुस्तीपटूंनी हजेरी लावली होती. टेंभूर्णीत आयोजित कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी जवळपास 25 हजार कुस्ती शौकिनांची उपस्थिती होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM Resigns : कर्नाटकच्या राजकारणात भूकंप! मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा राजीनामा; DK शिवकुमार होणार नवे CM, काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय

प्राजक्ता माळीने कान्सच्या रेड कार्पेटवर नेसलेली साडी कुठली आहे ठाऊक आहे? ठाण्यासोबत आहे खास कनेक्शन

वैभव सूर्यवंशी म्हणजे भारतीय क्रिकेट नाही! १५ वर्षीय खेळाडूला टीम इंडियात संधी देण्याच्या विरोधात उभा राहिला दिग्गज, म्हणाला...

अनुराग कश्यप यांच्या ‘बंदर’चं नवीन गाणं रिलीज; बॉबी देओलची भूमिका चर्चेत

Sinhgad Palace History : सिंहगडावरचा भव्यदिव्य राजवाडा कोणी विकला? थक्क करणारा इतिहास अन् दुर्मिळ फोटो पाहा

SCROLL FOR NEXT