3 lakh 66 thousands seats are vacant in eleventh class in state nagpur news 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात अकरावीच्या पावणेदोन लाख जागा रिक्त, प्रवेशप्रक्रिया संपली

मंगेश गोमासे

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीमार्फत घेण्यात येत असलेल्या अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेच्या 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह'ची दुसरी फेरी काल संपली. मात्र, यावर्षी राज्यात १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. अकरावीतील ५ लाख ४३ हजार ७८५ जागांसाठी या वर्षी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून प्रवेश देण्यात आले. त्या माध्यमातून ३ लाख ६६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदविला. 

अकरावी प्रवेश प्रक्रियेत पाच शहरांतील कनिष्ठ महाविद्यालयांचा सहभाग आहे. त्यात प्रवेशासाठी जुलैपासून प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. ३१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरपर्यंत पहिल्या यादीतील १३ हजार ४५४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदवले. मात्र, यानंतर मराठा आरक्षणासाठी आंदोलनास सुरुवात झाली. त्यामुळे राज्य सरकारने अकरावीच्या प्रवेशास तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली. तब्बल दोन महिने प्रक्रिया रखडल्याने विद्यार्थ्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होता. मात्र, पुन्हा अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ डिसेंबर ते ३० जानेवारीदरम्यान घेण्यात आली. मात्र, त्यानंतरही जागा रिक्त असल्याने विभागाने शेवटची 'फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह' फेरी ५ ते १६ फेब्रुवारीदरम्यान घेण्यात आली. यामध्ये मंगळवारपर्यंत (ता. १६) लाख ६६ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. आता प्रवेशप्रक्रिया बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या वर्षी संपूर्ण राज्यात १ लाख ७७ हजार १९८ जागा रिक्त असल्याचे चित्र दिसून आले आहे. 

  • एकूण जागा - ५,४३,७८५ 
  • प्रवेश घेतलेले विद्यार्थी - ३,६६,६३७ 
  • रिक्त जागा - १ लाख ७७ हजार १९८ 

विभागनिहाय आकडेवारी - 

विभाग एकूण जागा प्रवेश घेतलेले विद्यार्थी रिक्त जागा
नागपूर  ५९,२५०  ३४,७९९ (८८.४४ टक्के)  २४,४५१ (४१.२ टक्के) 
मुंबई ३,२०,७५०  २,२३,६५१ (८६.० २ टक्के)  ९७,०९९ (३०.२७ टक्के) 
पुणे १,०७,०९५  ७१,५५४ (८१.९ टक्के)  ३५,५४१ (३३.१९ टक्के) 
औरंगाबाद  ३१४७० १६,९३३ (७७.७६ टक्के)  १४,५३७ (४६.१९ टक्के) 
नाशिक  २५,२७०  १९,७०० (७३.२७ टक्के)  ५,५७० (२२.०४ टक्के) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT