Nanded hospital deaths 
महाराष्ट्र बातम्या

राज्यात दोन दिवसात ४१ रुग्णांचा मृत्यू , हायकोर्टात स्युओ मोटो याचिका दाखल! उद्याच तातडीची सुनावणी...

Sandip Kapde

राज्यातील सरकारी रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. रुग्णालयातील मृत्यूप्रकरणी हायकोर्टात स्युओ मोटो याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी उद्या तातडीची सुनावणी होणार आहे. कोर्टाने स्वत:हून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून स्युओ मोटो याचिका दाखल केली.

दोन दिवसांत राज्यातील सरकारी रुग्णालयात 41 जणांचा मृत्यू झाला. उद्या (बुधवार) कोर्टात सुनावणी लावण्यात आली असून महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांना राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करा, असे आदेश देण्यात आले आहेत.

36 तासांत झालेल्या 31 रुग्णांचा मृत्यू

विरोधकांच्या रोषाला तोंड देत एकनाथ शिंदे सरकारने गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ मंत्री नांदेडला परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पाठवले होते. नांदेड येथील  डॉ. शंकरराव चव्हाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अवघ्या 36 तासांत झालेल्या 31 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारने चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.

घाटी शासकीय रुग्णालयात दोन अर्भकांसह 10 जणांचा मृत्यू -

तसेच छत्रपती संभाजीनगर येथील घाटी शासकीय रुग्णालयात दोन अर्भकांसह 10 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल्याने विरोधकांकडून नव्याने हल्लाबोल सुरू झाला. त्यामुळे राज्यभरातील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती आहे. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात ठाण्यातील सरकारी छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच रात्रीत 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. मात्र यातून सरकारने धडा घेतला नसल्याची टीका विरोधकांनी केली आहे. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदेडच्या रूग्णालयातील मृत्यूची चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, प्राथमिक तपासात औषध, डॉक्टर किंवा इतर कर्मचाऱ्यांची कमतरता नसल्याचे समोर आले, तरीही अशी दुर्घटना घडली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करू.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arun Dongale Gokul Milk Election : गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळेंची मोठी घोषणा; ‘ही माझी शेवटची गोकुळची निवडणूक’

Marathi News Live Updates : मनोज जरांगेच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Mumbai Metro: गणेशोत्सवात मुंबई मेट्रोची स्पेशल सर्व्हिस! मध्यरात्रीपर्यंत विशेष सेवा, शेवटची ट्रेन कधी धावणार?

Manoj Jarange: नोटिसा अन् चौकशा सुरू... आता मनोज जरांगे काय करणार? मुंबईबाबत घेतला मोठा निर्णय, बावनकुळेंना नेमकं काय म्हणाले?

गणरायाच्या आगमनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! कोकणात जाताना कारचा अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

SCROLL FOR NEXT