corona patient
corona patient Sakal
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा आलेख वाढताच; 24 तासांत 46,406 रूग्णांची नोंद

निनाद कुलकर्णी

मुंबई - राज्यातील कोरोना बाधितांची संख्या काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसून गेल्या 24 तासात राज्यात 46,406 नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 36 जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death In Maharashtra ) झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर आज एकाही ओमिक्रॉनबाधिताची (Omicron) नोंद करण्यात आलेली नाही. (Maharashtra Latest Corona Updates In Marathi)

दरम्यान, आज राज्यात ओमिक्रॉनच्या (Omicron Cases In Maharashtra) एकाही रुग्णांची नोंद करण्यात आलेली नसून, आतापर्यंत राज्यात 1,367 ओमिक्रॉनबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 775 रुग्ण ओमिक्रॉनमुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर 2 (Death Percentage In Maharashtra ) टक्के झाला आहे. राज्यात सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.39 टक्के नोंदविण्यात आला आहे. सध्या राज्यात 17 लाख 95 हजार 631 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर, 9124 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. (Active Corona Cases In Maharashtra)

Omicron बाबत आरोग्य मंत्रालयाकडून रणनीतीत बदल

रुग्णालयाच्या आयसीयू (Corona Patient In ICU ) विभागामध्ये दाखल झालेल्या आणि मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नमुन्याचे जिनोम सिक्वेन्सिंग (Genome Sequencing) केलले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली आहे. ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग किती धोकादायक आहे हे तपासण्यासाठी हा बदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. (Health Ministry Changed Strategy Of Genome Sequencing Omicron)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Price 1 May: सामान्यांना दिलासा! LPGच्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या नवे दर

IPL 2024 MI vs LGS : मुंबईचा ‘प्लेऑफ’चा मार्ग खडतर ; लखनौचा विजय,स्टॉयनिसची चमक

Bicycle Crunches: सायकल क्रंच करताना 'या' चुका करू नका, जाणून घ्या योग्य पद्धत

Mumbai News: दुर्गम भागातील नाही, भांडुपमधील प्रकार! डॉक्टरांनी केली टॉर्चच्या प्रकाशात प्रसूती, महिलेसह बाळाचा मृत्यू!

Latest Marathi News Live Update : मी आतापर्यंत कोणालाही धमकी दिली नाही- अजित पवार

SCROLL FOR NEXT