dcm ajit pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटीचे 50 हजार कर्मचारी संपातच! अजितदादांनी दिली 31 मार्चची डेडलाईन

सर्व संपकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर यावे, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तरीही, सद्यस्थितीत 49 हजार 637 कर्मचारी संपातच आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाकडून संबंधितांवर कठोर कारवाई निश्‍चित मानली जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास एसटी कर्मचाऱ्यांना पगारवाढ दिली असून त्यांच्या वेतनाची हमी राज्य शासनाने घेतली आहे. कर्मचाऱ्यांचे निलंबन, बडतर्फीदेखील थांबविली आहे. त्यामुळे सर्व संपकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत कामावर यावे, अन्यथा कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. तरीही, सद्यस्थितीत 49 हजार 637 कर्मचारी संपातच आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतरही कर्मचारी संपावर ठाम असल्याने महामंडळाकडून संबंधितांवर कठोर कारवाई निश्‍चित मानली जात आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते मिळावेत, या मागणीसाठी जवळपास 95 हजार कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्‍टोबरपासून संप पुकारला आहे. आजवर 100 पर्यंत कर्मचाऱ्यांनी विविध कारणास्वत आत्महत्या केल्या आहेत. तरीही, त्यासंदर्भात अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. दरम्यान, हा विषय सध्या उच्च न्यायालयात असून न्यायालयाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सकारात्मक तोडग्याची अपेक्षा आहे. विलीनीकरणासंदर्भातील समितीने विलीनीकरण करणे आर्थिकदृष्ट्या परवडणार नसल्याचा अहवाल दिला आहे. तरीही, कर्मचारी त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. तत्पूर्वी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहनमंत्री अनिल परब यांनी संपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. पण, कर्मचाऱ्यांनी अजूनपर्यंत संप मागे घेतलेला नाही. पाच महिन्यांपासून संप सुरु असल्याने एसटीचा प्रवासी खासगी वाहनातून प्रवास करू लागला आहे. दहावी-बारावीसह एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय त्यामुळे झाली. तरीही, कर्मचारी त्यांच्या मागणीवर ठाम असून आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना 31 मार्चपर्यंत डेडलाईन दिली आहे. आता पुढील तीन दिवसांत संप मिटणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेतली जाणार आहे.

महामंडळाची सद्यस्थिती
एकूण कर्मचारी

81,673
कामावर आलेले कर्मचारी
32,046
संपातील कर्मचारी
49,637
संपामुळे बुडालेले अंदाजित उत्पन्न
1,980 कोटी

दररोज सहा-साडेसहा कोटींचेच उत्पन्न
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे 32 हजार 46 कर्मचारी सध्या कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून जवळपास पाच हजार गाड्या विविध मार्गांवर धावत आहेत. संपापुर्वी महामंडळाला दररोज 22 कोटींचे उत्पन्न मिळत होते. पण, संपामुळे महामंडळाचे उत्पन्न दररोज सरासरी सहा ते साडेसहा कोटींपर्यंतच आहे. त्यामुळे महामंडळाचा संचित तोटा 12 हजार कोटींहून अधिक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर प्रत्येकाला उत्पन्नाचे टार्गेट देऊन तो संचित तोटा भरून काढण्याचा प्रयत्न होईल, असेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpati Visarjan 2025 Live Updates : परळच्या राजाची गुलाल उधळत मिरवणूक; लालबागचा राजाही मंडपातून निघाला...

Govinda Komkar : वनराजच्या अंत्यविधीलाच टोळीनं घेतलेली शपथ, १९ वर्षीय मुलाला गोळ्या घातल्या; नाना पेठेत काय घडलं?

'लालबाग राजा'च्या मुख्य गेटसमोर 'हिट अँड रन', २ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू, एक जखमी

आणखी एका अभिनेत्रीने सोडली 'तू ही रे माझा मितवा' मालिका; तिच्याजागी दिसणार 'ही' गाजलेली अभिनेत्री

Latest Maharashtra News Updates : कल्याणमध्ये भरदिवसा सोनसाखळी चोरली

SCROLL FOR NEXT