Oath Taking Ceremony Esakal
महाराष्ट्र बातम्या

Oath Taking Ceremony : आठवलेंना संधी राणेंना डच्चू; राज्यातील या खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या संपुर्ण यादी

Oath Taking Ceremony : मोदींसोबत जवळपास ३० ते ४० जणांना मंत्रीपदी शपथ दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी पंतप्रधान (pmo) कार्यालयातून मंत्र्यांना फोन जात आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नरेंद्र मोदी एनडीए सरकारचे पंतप्रधान म्हणून आज दिल्लीमध्ये शपथ घेणार आहेत. नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसोबत जवळपास ३० ते ४० जणांना मंत्रीपदी शपथ दिली जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यासाठी पंतप्रधान (pmo) कार्यालयातून मंत्र्यांना फोन जात आहे. मोदी सरकारमध्ये यावेळी टीडीपी आणि जेडीयूची महत्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे एनडीएतील मंत्रीपद दिले जाणाऱ्या सर्वच नेत्यांना फोन केले जात आहे.

दरम्यान, एनडीए सरकारमध्ये कोणाकोणाची वर्णी लागणार? याबाबतची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली असतानाच महाराष्ट्रामधून पाच जणांना मंत्रिपद जवळपास निश्चित झालं झाल्याची माहिती आहे. ज्या खासदारांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यात येणार आहे, त्यांना दिल्लीतून फोन आल्याची माहिती आहे.

नितिन गडकरी, राजनाथ सिंह, जीतन राम मांझी, जयंत चौधरी, चिराग पासवान, जेडीयू नेता रामनाथ ठाकूर आणि अनुप्रिया पटेल यांना फोन आले आहे, अशी माहिती आहे. तर महाराष्ट्रातून नितीन गडकरी, पीयूष गोयल, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, रामदास आठवले यांना फोन आल्याची माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादी गटाच्या प्रफुल्ल पटेल यांना अद्याप फोन आलेला नाही.

महाराष्ट्रातील फोन आलेल्या नावांची चर्चा

नितीन गडकरी

पीयूष गोयल

रक्षा खडसे

प्रतापराव जाधव

रामदास आठवले

मुरलीधर मोहोळ

आतापर्यंत शपथविधीसाठी निरोप आलेले खासदार-

अमित शाह

राजनाथ सिंह

नितिन गडकरी

एस जयशंकर

पीयूष गोयल

प्रल्हाद जोशी

जयंत चौधरी

जीतनराम मांझी

रामनाथ ठाकुर

चिराग पासवान

एच डी कुमारस्वामी

ज्योतिरादित्य सिंधिया

अर्जुन राम मेघवाल

प्रताप राव जाधव

रक्षा खड़से

जितेंद्र सिंह

रामदास अठवले

किरेन रिजुजु

राव इंद्रजीत सिंह

शांतनु ठाकुर

मनसुख मांडविया

अश्विनी वैष्णव

बंडी संजय

जी किशन रेड्डी

हरदीप सिंह पुरी

बी एल वर्मा

शिवराज सिंह चौहान

शोभा करंदलाजे

रवनीत सिंह बिट्टू

सर्वानंद सोनोवाल

अन्नपूर्णा देवी

जितिन प्रसाद

मनोहर लाल खट्टर

हर्ष मल्होत्रा

नित्यानंद राय

अनुप्रिया पटेल

अजय टमटा

धर्मेंद्र प्रधान

निर्मला सीतारामन

सावित्री ठाकुर

राम मोहन नायडू किंजरापु

चंद्रशेखर पेम्मासानी

मुरलीधर मोहल

कृष्णपाल गुर्जर

गिरिराज सिंह

गजेंद्र सिंह शेखावत

श्रीपद नायक

सी आर पाटिल

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एकही मंत्रिपद नाही?

महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल्ल पटेलांचं नाव शुक्रवारपासून पुढे येत होतं. परंतु आता त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याची शक्यता आहे. 'साम टीव्ही'ने हे वृत्त दिले आहे. एनडीएमधील घटकपक्षांना भाजप सन्मानाने संधी देणार असल्याचं स्पष्ट असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला मात्र एकही मंत्रिपद मिळणार नसल्याचं दिसून येत आहे. प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपदासाठी फोन आलेली नाही, असं वृत्त 'साम'ने दिलेलं आहे.

नारायण राणे, भागवत कराड यांना अद्याप फोन नाही

नारायण राणे, भागवत कराड यांना अद्याप मंत्रिपदासाठी फोन गेलेला नाही. त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांच्या नावाची देखील चर्चा होती. मात्र, अजून त्यांना फोन आलेला नाही.

सध्या केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या महाराष्ट्रातील 2 मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती साम टीव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिली आहे. नारायण राणे आणि भागवत कराड यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती आहे. भाजप हायकमांड कडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रीमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचं कळवलं आहे. नारायण राणे MSME मंत्री होते तर कराड अर्थ राज्यमंत्री होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Visarjan: ...पुढच्या वर्षी लवकर या! मुंबईत १२ वाजेपर्यंत ४०० हून अधिक श्रींचे विसर्जन

ड्रग्ज प्रकरणी सर्वात मोठी कारवाई, १२ हजार कोटींचा माल जप्त; २०० ग्रॅमचा तपास करताना ३२ हजार लीटरपर्यंत पोहोचले पोलीस

Ganpati Visarjan 2025 Live Updates : पुणे- तांबडी गणपतीचे विसर्जन

Team India: ऋतुराज गायकवाडवर पुन्हा 'अन्याय'! १८४ धावांची खेळी करूनही भारताच्या संघात मिळाले नाही स्थान

India Tallest Ganesha Idol Immersion: भारतातील सर्वात उंच गणपती मूर्तीचे विसर्जन, भक्ती, उत्साह आणि भावनिक निरोपाचा क्षण, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT