women st journey concession sakal
महाराष्ट्र बातम्या

Womens St Journey : राज्यात आठवड्याभरता ७६ लाखापेक्षा अधिक महिलांनी केला एसटीतून प्रवास

एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने आठवड्याभरात राज्यभरातून ७६ लाखापेक्षा जास्त महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने आठवड्याभरात राज्यभरातून ७६ लाखापेक्षा जास्त महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे.

मुंबई - एसटी प्रवासात ५० टक्के सवलत दिल्याने आठवड्याभरात राज्यभरातून ७६ लाखापेक्षा जास्त महिला प्रवाशांनी एसटीतून प्रवास केला आहे. याशिवाय मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमधून धावणाऱ्या एसटीमधील महिला प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे महिला प्रवाशांचा सोयीसाठी एसटी महामंडळ लवकरच रेल्वे,बेस्टप्रमाणे महिला स्पेशल एसटी चालविण्याचा निर्णय घेऊ शकते अशी माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

राज्य सरकारने २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी मोठी घोषणा केली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसच्या तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती. १७ मार्च २०२३ पासून एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमधून महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्याची योजना लागू करण्यात आली आहे.

त्यामुळे पहिल्या दिवशीपासून या सवलतीचा पुरेपूर उपयोग करताना राज्यातील महिला दिसून येत आहेत. या हाफ तिकीट योजनेला फुल्ल प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. १७ मार्च ते २३ मार्च २०२३ पर्यत राज्यभरातून ७६ लाख ३ हजार २२ महिला प्रवाशांनी प्रवास केला आहे. ज्यामधून एसटी महामंडळाला १९ कोटी ९७ लाख रुपये महसूल मिळाला आहे. आता इतका महसूल राज्य सरकार एसटी महामंडळाला द्यावा लागणार आहे.

शहरात फुल्ल प्रतिसाद -

एसटी महामंडळाच्या बससेवेत तिकीटदरात ५० टक्के सवलत दिल्याचा पुरेपूर फायदा शहरातील महिला घेताना दिसून येत आहे. या हाफ तिकीट योजनेला मुंबई ,पुर्व-पश्चिम उपनगरे आणि ठाणे,नवी मुंबई,विरार,पनेवलमध्ये फुल्ल प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हातील १४ लाख २३ हजार २५८ महिलांनी प्रवास केला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात मुंबई व ठाणे विभागाच्या बस धावतात.

सुमारे ४० ते ४२ मार्गावर दिवसभरात एसटीच्या एक हजार फेऱ्या होतात. त्यामुळे भविष्यात या मार्गावर महिला प्रवाशांच्या माध्यमातून एसटीला चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे वाढती महिला प्रवासी संख्यात लक्षात घेऊन एसटी महामंडळ लेडीज स्पेशल एसटी चालविण्याचा निर्णय घेऊ शकते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहेत.

आठवड्याभरची आकडेवारी -

  • मुंबई विभाग - ८४ हजार ५५९

  • ठाणे विभाग - २ लाख २२ हजार १६१

  • पालघर विभाग - २ लाख ८३ हजार ५९४

  • रायगड विभाग - २ लाख ६२ हजार २४३

  • रत्नागिरी विभाग - ३ लाख ७० हजार ५३९

  • सिंधुदुर्ग विभाग - २ लाख १६२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Who Is Jamie Smith? टीम इंडियाची झोप उडवणारा जेमी स्मिथ कोण? ज्याने केलीय १५० धावांची ऐतिहासिक खेळी, मोडले अनेक विक्रम...

२५ वर्षांनी झी मराठीवर दिसणार लोकप्रिय अभिनेत्री, कधीकाळी ठरलेली गाजलेली नायिका; नव्या मालिकेतून करणार कमबॅक

Eknath Shinde: पुण्यात 'जय गुजरात'ची घोषणा; मुंबईत सारवासारव, अमित शहांसमोर दिलेल्या नाऱ्यावर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT