महाराष्ट्र

महाराष्ट्राला झाल्या मुली हव्याशा... 

मनिषा मोहोड-येरखेडे

नागपूर - एकीकडे नकोशा म्हणून नाकारल्या जात असताना दुसरीकडे मुलींना दत्तक घेण्याचे प्रमाण महाराष्ट्रात वाढले आहे. नकोशा असलेल्या नवजात मुलींना अपत्य नसलेल्या बऱ्याच कुटुंबांनी मायेची ऊब देत त्यांचे पालकत्व स्वीकारले आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रात एकूण दत्तक घेतलेल्या एकूण मुलांमध्ये 80 टक्के प्रमाण मुलींचे असून, यात राज्य आघाडीवर आहे. 

"मुलगा वंशाचा दिवा' या म्हणीप्रमाणे पूर्वी मुलगा दत्तक घेणाऱ्यांचे प्रमाण अधिक होते. परंतु, सध्या हा समाज मागे पडत चालला असून, अनेक दापंत्यांचा कल मुलगी दत्तक घेण्याकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील ज्या अनाथालयांतून बालके दत्तक घेण्यात आली, त्यात मुलींचेच प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. 

समाजात एका बाजूने मूल नसलेल्या दांपत्यांची संख्या वाढत असतानाच गरिबीमुळे किंवा अनैतिक संबंधांतून जन्मलेले बाळ सोडून देण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. अशी बेवारस मुले मग बाल समितीच्या माध्यमातून अनाथालयात जातात. दत्तक घेण्याच्या प्रवृत्तीतही बदल घडून येत आहे. एक मूल असताना दुसरे मूल दत्तक घेतले जात आहे. मुलगा असेल, तर मुलगी आणि मुलगी असेल, तर मुलगा दत्तक घेण्याचे प्रमाणही वाढत आहेत. परंतु, पालकांना मुले दत्तक देण्यास अनाथालय प्राधान्य देतात. नागपूर जिल्ह्यात एकूण आठ अनाथालये आहेत. यातून दत्तक घेतले जाते. पालकांकडून एक ते तीन वर्षे वयाच्या मुलांना अधिक पसंती असते. 

24 हजार मुलांना हक्काचे पालक 
अनाथ आणि गरजू बालकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी "सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स ऍथॉरिटी'ने (कारा) ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. ऑगस्ट 2015 पासून ही दत्तक प्रक्रिया ऑनलाइन करण्यात आली. महाराष्ट्र राज्य दत्तक विधान संस्थेच्या माहितीनुसार (सारा) गेल्या पाच वर्षांत देशभरातील एकूण 24 हजारांवर मुलांना हक्काचे पालक मिळाले आहेत. त्यातील 21 हजार 895 मुले आपल्याच देशातील कुटुंबांत, तर 2,170 मुले परदेशांतील कुटुंबांत दत्तक गेली आहेत. देशातील अन्य कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे 2,640 मुलींना दत्तक घेतले आहे. 

उबदार घरट्यात... 

दत्तक घेणाऱ्यांची संख्या 
2016-17 - 3,210 (देशात) 
मुलींची संख्या - 711 

2017-18 - 3,276 (देशात) 
मुलींची संख्या - 1,852 

2017 - 642 (महाराष्ट्र) 

परदेशात जाणाऱ्या मुलींची संख्या - 2,170 
कर्नाटक - 252 
पश्‍चिम बंगाल - 203 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबादची पॉवरप्लेमध्ये खराब सुरूवात; राजस्थानने दिले दोन धक्के

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT