Railway  esakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari साठी मध्य रेल्वेकडून मोठी घोषणा; वारकरी, भाविकांसाठी धावणार 'इतक्या' विशेष गाड्या

यामध्ये नागपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २५ आणि २८ जूनला चार फेऱ्या होतील.

सकाळ डिजिटल टीम

जालना - पंढरपूर, पंढरपूर - नांदेड, औरंगाबाद - पंढरपूर, पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वेच्या २८ व २९ जून अशा दोन फेऱ्या होणार आहेत.

सोलापूर : मध्य रेल्वेच्या वतीने आषाढीसाठी (Ashadhi Wari 2023) महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून व इतर राज्यांतून लाखोंच्या संख्येने येणाऱ्या वारकरी व भाविकांसाठी एकूण ८२ विशेष गाड्या धावणार आहेत. नियमित धावणाऱ्या गाड्यांसह एकूण १८१ गाड्या या कालावधीत धावतील.

यामध्ये नागपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २५ आणि २८ जूनला चार फेऱ्या होतील. नागपूर- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी आणि अमरावती- पंढरपूर विशेष रेल्वे गाडीच्या २६ आणि २९ जूनला चार फेऱ्या होतील, खामगाव- पंढरपूर विशेष रेल्वे गाडी आणि भुसावळ- पंढरपूर विशेष रेल्वे गाडीच्या २६ आणि २९ जूनला चार फेऱ्या होतील.

लातूर- पंढरपूर- लातूर विशेष रेल्वे गाडीच्या २६ ते ३० जूनपर्यंत आठ फेऱ्या होतील, मिरज- पंढरपूर- मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २४ जून ते ३ जुलै दरम्यान आणि मिरज - कुर्डुवाडी - मिरज विशेष रेल्वे गाडीच्या २० फेऱ्या होतील.

पंढरपूर -मिरज -पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीच्या २४ जून ते ३ जुलै दरम्यान दहा फेऱ्या होणार आहेत. जालना - पंढरपूर, पंढरपूर - नांदेड, औरंगाबाद - पंढरपूर, पंढरपूर - औरंगाबाद या विशेष रेल्वेच्या २८ व २९ जून अशा दोन फेऱ्या होणार आहेत. आदिलाबाद- पंढरपूर- आदिलाबाद विशेष रेल्वे गाडीच्या २८ जून आणि २९ जून अशा दोन फेऱ्या होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT