महाराष्ट्र बातम्या

Pune News: महामार्गावर झाला दारुचा टँन्कर पलटी,वाहतुकीची मोठी कोंडी

पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत शिवरे फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालु असुन त्यासाठी दोन्ही बाजुची वाहतुक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे | On the Pune Satara Highway, the work of flyover is going on at the Shivre fork in the limits of Shivre village and for this purpose the traffic service on both sides has been diverted by road.

सकाळ वृत्तसेवा

Pune Satara Highway: पुणे सातारा महामार्गावर शिवरे ता.भोर गावच्या हद्दीत अल्कोहल वाहतुक करणारा टँन्कर पलटी झाला असुन रस्त्यामध्येच टँन्कर अडवा झाल्या मोठी वाहतुक कोंडी झाली आहे,महामार्ग वाहतुक पोलिस व राजगड पोलिस क्रेनच्या सहाय्याने टँन्कर बाजुला करुन वाहतुक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पुणे सातारा महामार्गावर शिवरे गावच्या हद्दीत शिवरे फाट्यावर उड्डाणपुलाचे काम चालु असुन त्यासाठी दोन्ही बाजुची वाहतुक सेवा रस्त्याने वळवण्यात आली आहे.

आज ता.23 रोजी सकाळी सातारा बाजुकडुन पुणे बाजुकडे जाणारा टँन्कर क्र. एम एच 48 बी एम 4132 हा उ्डडाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी सेवा रस्त्यावर वळत असतानाच पलटी झाला अरुंद सेवा रस्त्यावर टँन्कर पलटी झाल्याने सर्वच वाहतुक थांबली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्यासाठी कार्यवाही चालु केली आहे

या अपघातामुळे महामार्गवरील वाहतुक पुर्ण ठप्प झाली असुन वाहतुक कोंडी दुर करण्यासाठी महामार्ग पोलिस व राजगड पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी असुन चार क्रेनच्या सहाय्याने टँन्कर सरळ करण्याचे काम चालु आहे.

टँन्कर मध्ये अल्कोहोल असल्याने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन दलाची गाडी देखिल या ठिकाणी तैनात करण्यात आल्याची माहीती महामार्ग वाहतुक शाखेचे सहाय्यक निरीक्षक अस्लम खातिब यांनी दिली.

वाहतुक कोंडीने सकाळ सकाळ पुणे शहराकडे जाणारया नागरीकांची मोठी अडचण झाली असुन वाहनांच्या रांगा वरवे गावा पर्यंत पोहचल्या आहेत टँन्कर अवजड असल्याने दुर करण्यासाठी वेळ लागत असुन पर्यायी रस्ता करता येतो आहे काय यासाठी देखिल वाहतुक पोलिस प्रयत्न करत असल्याचे सागण्यात आले आहे.

सोबत फोटो-- शिवरे ता.भोर गावच्या हद्दीत महामार्गावर टँन्कर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असुन क्रेन च्या सहाय्याने टँन्कर बाजुला काढण्याचे काम चालु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Updates : देवळाली कॅम्पमध्ये हायवा ट्रक बंगल्यात घुसला

Whatsapp Call Feature : इंटरनेट, नेटवर्क नसतानाही व्हॉट्सअ‍ॅप कॉल करता येणार, ते कसे? पाहा एका क्लिकवर

Video : ₹2,500,000,000 मध्ये बनलेल्या रणबीर-आलियाच्या आलिशान घराची झलक समोर ! असं आहे घराचं इंटिरियर

Health Tips: डाएट्‌सच्या फॅड मध्ये अडकलाय? "झिरो फिगरच्या प्रेमात पडण्यापूर्वी आधी फायदे तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT