महाराष्ट्र बातम्या

Mobile Blast in Nashik : नाशिकमध्ये मोबाईलचा भीषण स्फोट! घराच्या काचा फुटल्या, तीन जण जखमी

नाशिकच्या उत्तम नगर मध्ये मोबाईलचा स्फोट...

सकाळ वृत्तसेवा

विकास बाविस्कर : सकाळ वृत्तसेवा

Nashik News : उत्तम नगर येथील सर्वेश्वरमहादेव चौक या ठिकाणी एका घरात पहाटेच्या सुमारास चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याने घरात असलेले तिघे जखमी असून यातील एक जण गंभीर जखमी आहे. (A terrible blast of mobile phones in Nashik! The windows of the house broke)

उत्तम नगर येथील सर्वेश्वरमहादेव चौक या ठिकाणी भाडे तत्ववार राहणारे कुटुंबियांनी रात्री झोपताना चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट झाला यावेळी शेजारी बॉडी स्प्रेच्या बाटल्यांचा देखिल स्फोट झाल्याने घरात असलेले तिघही सदस्य जखमी झाले आहे. यातील एक जण गंभीर जखमी असून तिघांनाही खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

प्रसंगी स्फोट इतका भीषण होता की झालेल्या घराबाहेर लावलेल्या चारचाकी वाहनांच्या काचांना तडे गेले असून शेजारच्यांच्या घराच्या खिडक्यांची अशीच काही परिस्थिती झालेली आहे.

घटनेची माहिती समजताच परिसरातील काही नागरिकांनी जखमींना इस्पितळात उपचारासाठी दाखल केले.यामध्ये तुषार जगताप, शोभा पंडित जगताप, बाळकृष्ण तुळशीराम सुतार यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शोभा जगताप यांची सून ब्युटी पार्लरचा व्यवसाय करतात यामुळे घरात बॉडी स्प्रे सारख्या इतरही बाटल्या होत्या. त्यांनी मोबाईलचा स्फोट झाल्यानंतर पेट घेतल्याने हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

SCROLL FOR NEXT